बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज व्यक्तींवर चित्रपट बनत असतात. या दिग्गज व्यक्तींचे चित्रपट प्रेक्षक देखील खूप आवडीने पाहत असतात. अशातच बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्यावर आधारित ‘न्याय : द जस्टिस’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटावर निर्बंध आणण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दर्शवला आहे. वकील विकास सिंग यांनी त्यासाठी खूप मोठी लढाई लढली आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे. दिलीप कुमार यांनी ‘न्याय : द जस्टिस’ हा चित्रपट लिहिला आहे. तसेच दिग्दर्शन देखील त्यांनीच केले आहे. सरला ए साराओगी आणि राहुल शर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
या चित्रपटाचे निर्माते राहुल शर्माने सांगितले की, “आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे की, आम्हाला नक्की न्याय मिळणार आहे आणि आम्ही यामुळे खूप खुश आहोत. आम्ही हे आधीपासून सांगितले आहे की, हा चित्रपट आम्ही पैसा कमविण्यासाठी बनवला नाहीये. या चित्रपटातून आम्ही सत्य समोर आणत आहोत, जेणेकरून न्याय होऊ शकेल. जेव्हा चित्रपटगृह उघडली जातील. तेव्हा हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.”
#SushantSinghRajput fans get furious after watching the film #NyayTheJustice's promohttps://t.co/st3a1Rvrn6
— @zoomtv (@ZoomTV) April 14, 2021
या चित्रपटात जुबैर खान आणि श्रेया शुक्ला मुख्य भूमिकेत काम करणार आहेत. तर अमन वर्मा ईडीची भूमिका निभावणार आहेत. असरानी या चित्रपटात महिंदर सिंगच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये, तर शक्ती कपूर एनसीबी चीफच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनंत जोग यांनी मुंबई पोलीस ऑफिसरची भूमिका निभावली आहे. अनवर फतेहीने बिहार पोलीस अधिकारी, तर सुधा चंदन सीबीआय चीफच्या भूमिकेत दिसणार आहे. (Nyay the justice film based on sushant singh rajput case set for release after Delhi High court denies stay)
The Delhi HC has once again denied a stay on the movie 'Nyay: The Justice' which is based on #SushantSinghRajput's death case. The movie will be released in theatres. Read on!#NyayTheJustice | #LateSushantSinghRajput | #DelhiHighCourt | #DilipGulati https://t.co/fqWNZg67kN
— SpotboyE (@Spotboye) July 28, 2021
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने मागच्या वर्षी त्याच्या घरी फासी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने चित्रपटसृष्टीला खूप मोठा धक्का बसला होता. खूप वेळ चौकशीनंतर ड्रग्ज, पैसा आणि डिप्रेशन यासारख्या अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्तवर्ती हीची देखील खूप चौकशी झाली होती. याच बरोबर बॉलिवूडमधील नेपोटिझमसारखे अनेक विषय समोर येऊन त्यावर चर्चा झाली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनयाच नव्हे, तर अभ्यासातही अव्वल आहे सारा; ‘या’ अवघड विषयात १०० टक्के मिळवत केलं होतं तिने टॉप