Saturday, September 30, 2023

आता सुट्टी नाही! सलग दोन आठवडे बॉक्स ऑफिसवर ‘Gadar 2’चाच डंका, कमाईचा आकडा उडवेल तुमचीही झोप

सनी देओलचा चित्रपट ‘गदर 2‘ बॉक्स ऑफिसवर थांबण्याचे नाव घेत नाही आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले आहेत, परंतु पहिल्या दिवसापेक्षा अधिक व्यवसाय केला आहे. ‘गदर 2‘ची लोकांची क्रेझ कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. या चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडला जबरदस्त कलेक्शन करून शाहरुख खानच्या ‘पठाण‘, सलमानच्या ‘टायगर जिंदा है’, केजीएफसह अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून दुहेरी अंकात कमाई केली आहे. रिलीजच्या 11व्या दिवशीही ही मालिका थांबलेली नाही. चला जाणून घेऊया ‘गदर 2‘ ने रिलीजच्या 11व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या सोमवारी किती कोटींची कमाई केली?

‘गदर 2’मध्ये (Ghadar 2) तारा आणि सकिना ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळाल्याने चाहत्यांच्या आनंदाला सीमा नाही. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन 11 दिवस झाले आहेत, पण तरीही चित्रपटगृहातील सर्व शो जवळपास हाऊसफुल्ल होत आहेत.

‘गदर 2’ने रिलीजच्या 10व्या दिवशी किती कमावले?
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बऱ्यापैकी नोटा छापत आहे. शनिवारी चित्रपटाच्या कमाईत 51.56 टक्क्यांनी वाढ झाली असून बॉक्स ऑफिसवर 31.07 कोटींचा व्यवसाय केला आहे. दुसऱ्या रविवारी, चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 25.20 टक्क्यांनी वाढ झाली आणि 38.9 कोटींचा गल्ला चित्रपटाने जमवला आहे. यासह, चित्रपटाने 10 दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे 377.20 कोटींचा निव्वळ व्यवसाय केला आहे.

त्याचवेळी, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 11व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या सोमवारच्या कमाईचे अंदाजे आकडे आले आहेत. आता 400 कोटींच्या दिशेने धाव घेतली आहे. हा चित्रपट पठाण नंतर 2023 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरेल. अनिल शर्माच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्याशिवाय उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, गौरव चोप्रा यांच्यासह अनेक कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. (On day 11 Ghadar 2 took a run towards 400 crores)

अधिक वाचा- 
सलमानचा ‘गजनी’ लूक सोशल मीडियावर व्हायरल; चाहते म्हणाले- ‘तेरे नाम 2ची तयारी…’
‘रोज मासे खा… ऐश्वर्या रायसारखे सुंदर व्हा’, भाजप सरकारच्या ‘या’ मंत्र्याचा तरुणांना अजब सल्ला

हे देखील वाचा