पाकिस्तान सध्या पुरामुळे प्रचंड उध्वस्त झाला आहे. या पुराने पाकिस्तानातील लाखो लोकांचे जीवन अचानक उद्ध्वस्त केले आहे. अनेक लोक बेघर झाले आहेत. पुरामुळे पाकिस्तानातील लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. आता पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयातने तिच्या देशातील पुराबाबत बॉलिवूड स्टार्सच्या मौनावर निशाणा साधला आहे. काय म्हणाली ती नेमकी चला जाणून घेऊ.
मेहविश हयात (Mehwish Hayat) ही पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. हयातने आता पाकिस्तानमधील पुराबाबत बॉलिवूड स्टार्सच्या मौनावर निराशा व्यक्त केली आहे. मेहविशने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माणुसकी आणि दुःखाची सीमा नसते.
पाकिस्तानमधील पुरावर बॉलीवूडच्या मौनावर एक पोस्ट शेअर करताना मेहविश हयातने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर “बॉलिवूड स्टार्सचे मौन आश्चर्यचकित करणारे आहे. वेदनांना कोणतेही राष्ट्रीयत्व, जात किंवा धर्म माहित नाही. राष्ट्रवादी राजकारणाच्या वरती उठून पाकिस्तानातील आपल्या चाहत्यांची काळजी घेऊ शकतो हे दाखविण्याची यापेक्षा चांगली संधी त्याच्यासाठी नाही. आपण दुःखातून जात आहोत आणि काही मायेच्या शब्दांनाही खुप किंमत असते असे तिने म्हणले आहे. सध्या पाकिस्तानी अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

मेहविश हयातबद्दल सांगायचे तर, तिने पाकिस्तानातील अनेक हिट चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. मेहविश हयात ज्या पाकिस्तानी चित्रपटात आहे तो चित्रपट हिट मानला जातो. तिच्या अभिनयासोबतच मेहविश तिच्या लूक आणि स्टाइल स्टेटमेंटमुळेही चर्चेत असते. आता मेहविश हयात बॉलीवूड सेलिब्रिटींवरील आपल्या पोस्टमुळे चर्चेत आहे. आता यावर बॉलिवूड कलाकार काय प्रतिक्रिया देणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – बापरे! अक्षय कुमार, प्रियांकाचे गाणे झाले तब्बल 17 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला, 2005 मध्ये झाले होते शुटिंग
आर माधवनने शेअर केला मजेशीर व्हिडिओ, तुम्हीही पोट धरुन हसाल
हॉलिवूड अभिनेता चॅडविक बोसमनला निधनाच्या दोन वर्षानंतर मिळाला पुरस्कार, मार्वल स्टुडिओने केली घोषणा