Latest Posts

बोल्ड पूजा सावंतच्या सोज्वळ अदा! पांढऱ्या ड्रेसमध्ये पाहायला मिळाला अभिनेत्रीचा दिलखेचक अंदाज


मराठी सिनेसृष्टीतील मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. ती तिच्या लुक्सने नेहमी सोशल मीडियावरील युजर्सचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या ग्लॅमरस लूकचे लाखो चाहते आहेत. सुंदर चेहरा आणि आकर्षक फिगर असणाऱ्या पूजाची फॅन फॉलोविंगही तगडी आहे. बऱ्याचदा आपले नवनवीन लूकमधील फोटो शेअर करून, ती चाहत्यांना पुरते वेडे करून सोडते. आता या बोल्ड अभिनेत्रीचे काही सुंदर फोटो समोर आले आहेत. यात तिची सोज्वळता पाहायला मिळाली आहे.

नुकतेच तिने शेअर केलेले हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. हे फोटो पूजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यात ती नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, यात पूजाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. सोबतच ती फोटोसाठी मस्त पोझ देत आहे.

तिचे हे फोटो शेअर करता क्षणीच व्हायरल व्हायला सुरुवात झाली होती. कारण यातील तिची सुंदरता कोणालाही मंत्रमुग्ध करणारी आहे. फोटोच्या कमेंट सेक्शनमध्येही तिच्या रूपाचे भरभरून कौतुक केले जात आहे. तसेच काही तासातच या फोटोवर तब्बल ३१ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. (pooja sawant flaunting her beauty in white dress)

अभिनेत्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने २०१० मध्ये आलेल्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिला हिंदी चित्रपटांचीही ऑफर आली. २०१९ मध्ये आलेल्या ‘जंगली’ या चित्रपटात ती विद्युत जामवालसोबत दिसली होती. यात तिने नायिकेची भूमिका साकारली होती. शिवाय तिने डान्स रियॅलिटी शोची परीक्षक म्हणून देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या

-वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का?’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट


Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss