‘कला ही कला असते…’, म्हणत प्राजक्ताने पहिल्यांदाच सोशल मीडियावर सादर केली तिची कविता


अभिनेत्री, सूत्रसंचालक आणि नृत्यांगना म्हणून आपल्यासमोर आलेली प्राजक्ता, आता एक कवयित्री म्हणून रसिकांच्या भेटीला आली आहे. तिचे ‘प्राजक्ताप्रभा’ हे काव्यसंग्रह नुकतेच प्रकाशित झाले आहे. ग्रंथाली प्रकाशित या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार आणि कवी असलेल्या प्रवीण दवणे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी तिच्यावर जवळच्या लोकांकडून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

आता प्राजक्तामध्ये असलेल्या कवयित्रीची झलक सोशल मीडियावरही पाहायला मिळाली आहे. नुकतीच तिने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून स्वतः लिहिलेली एक कविता पोस्ट केली आहे. या कवितेमधून तिने कलेबद्दल तिचे मत मांडले आहे.

तिने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत प्राजक्ता म्हणतेय की, “आज पहिल्यांदा सोशल मीडियावर कविता पोस्ट करतेय…कला…‘कला’ ही कला असते… ती तिच्याच ‘कलानं’ घ्यायला लावते…‘कलेकलेनं’ वाढत जाते, ‘कल्लाकाराला’ घडवते…ती तिच्याच ‘कलानं’ घ्यायला लावते…
‘कालाचं’ बंधन नसतं तिला…‘लक’ मात्र बरोबरीनं बाळगते…
जुळून आलं सगळं व्यवस्थित तर ‘कलाकंद’,नाहीतर सगळ्याचा ‘काला’ करुन जाते…
ती तिच्याच ‘कलानं’ घ्यायला लावते…‘कललात’ एकदा तिच्याकडे, की पुन्हा स्वत:ला सावरता येणं महाकठीण…
आणि वेळोवेळी स्वत:ला सावरुन नाही घेता आलं, तर ‘क्लेश’ मात्र देऊन जाते…ती तिच्याच ‘कलानं’ घ्यायला लावते…”

पुढे ती म्हणतेय की, “जीवनाच्या ‘कलकलाटात’ आयुष्याला ‘कल्हई’ करुन जाते…बेरंग, बेचव आयूष्याला
‘कलाटणी’ देऊन जाते…पडली एखाद्याच्या पदरात तर तो म्हणवतो ‘कलासंपन्न’…अन् नाही झेपली तर त्याला ‘कलंकित’ मात्र करुन जाते…
ती तिच्याच ‘कलानं’ घ्यायला लावते…ती तिच्याच कलानं…” (prajakta mali shared her first poetry on social media)

तिच्या या ‘कले’चं चाहत्यांकडून दमदार स्वागत झाल्याचं दिसत आहे. कमेंट्सच्या माध्यमातून नेटकरी तिचे भरभरून कौतुक करत आहेत. तसेच या पोस्टवर आतापर्यंत तब्बल ८१ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला माहितीये लोक माझ्या वडिलांचा तिरस्कार करतात…’; #meetoo बाबत आलिया कश्यपने केले तिचे मत व्यक्त

-राज कुंद्राच्या सांगण्यावरून अनेक प्रोडक्शन हाऊस बनवत होते पॉर्न व्हिडिओ; ७० पेक्षाही अधिक लोक लागले पोलिसांच्या हाती

-जान्हवी कपूरने स्टेजवर चुलती महीप कपूरसोबत लावले ठुमके; ‘नदियों पार’ गाण्यावरचा परफॉर्मेंस तूफान व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.