‘केसांचा कोंबडा छान केलाय’, सोशल मीडियावर रंगलीय प्राजक्ता माळीच्या आगळ्यावेगळ्या हेअरस्टाईलची चर्चा


प्राजक्ता माळी ही चाहत्यांमध्ये खासकरून तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग असणारी अभिनेत्री, फोटोशूट्सने तिच्या चाहत्यांना आकर्षित करत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर खूपच सक्रिय असून, ती तिच्या उत्कृष्ट फॅशन स्टेटमेंटद्वारे चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडियावर ती दरदिवशी तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. अशीच तिची एक पोस्ट आणि त्या खालचे कॅप्शन चर्चेचा विषय बनले आहे.

नुकतेच प्राजक्ताने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या उत्तम फॅशन स्टेटमेंटचं दर्शन घडत आहे. यामध्ये तिची स्टाईल अगदी पाहण्यासारखी आहे. या फोटोत तिने निळ्या ड्रेससह हाय बन बांधला आहे. सोबतच तिने घातलेले हार्ट शेप कानातले तिच्या या ओल्ड स्टायलिश लूकमध्ये आणखी भर घालत आहेत.

प्राजक्ताचे हे फोटो चाहत्यांच्या तर पसंतीस उतरले आहेत. मात्र तिच्या वडिलांनी या हेअरस्टाईलवर विचित्र पण मजेदार असे वक्तव्य केले आहे. होय! स्वतः अभिनेत्रीने फोटोखाली कॅप्शनमध्ये याबाबत लिहिलं आहे. प्राजक्ताने हे फोटो शेअर करत लिहिले की, “ही हेअरस्टाईल बघून पप्पा म्हणाले, केसांचा कोंबडा छान केलाय. पण वैयक्तिकरीत्या मला हे खूप आवडलं.” (prajakta mali shared her stylish photo her father commented funny on it)

विशेष म्हणजे, फोटोपेक्षा त्याचं कॅप्शनच अधिक चर्चेत आल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने याच लूकमधील तिचे काही फोटो पोस्ट केले होते. ते देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. हे फोटो शेअर करत प्राजक्ताने लिहिले होते की, “जाइये आप कहाँ जायेंगे, यह नजर लौट कर फिर आयेगी.” असे म्हणत अभिनेत्रीने अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलेले पाहायला मिळाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘… तो मैं पानी-पानी हो गयी’, भाग्यश्री मोटेच्या हॉट फोटोसोबत लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत

-जेव्हा गायत्री दातार म्हणते, ‘ये मौसम का जादू है मितवा!’ पाहा तिचा लेटेस्ट फोटो

-श्रुती मराठेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; तिच्या ‘हॉट ऍंड ग्लॅमरस’ फोटोला नेटकऱ्यांची पसंती


Leave A Reply

Your email address will not be published.