भारीच ना!! प्रमोद प्रेमी यादवचे ‘ट्रकवा वाला’ आले प्रेक्षकांच्या भेटीला; प्रदर्शित होताच लाखो हिट्सचा टप्पा पार


भोजपुरी सिनेसृष्टी मागील काही काळापासून मोठ्या स्वरूपात प्रकाशझोतात आली आहे. या इंडस्ट्रीला मोठी ओळख मिळवून देण्यात भोजपुरी संगीताचा मोठा वाटा आहे. भोजपुरी गाणे आणि त्यांना मिळणारी लोकप्रियता तुफान आहे. जवळपास दररोजच भोजपुरीचे एक तरी गाणे यूट्यूबवर प्रदर्शित होतच असते. कोरोना काळ असूनही भोजपुरीमध्ये असंख्य गाणी प्रदर्शित होत आहे.

नुकतेच भोजपुरीतील सुपरस्टार प्रमोद प्रेमी यादव याचे नवीन ‘ट्रकवा वाला’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. प्रदर्शित झाल्या झाल्या हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, गाजताना दिसत आहे. प्रमोद यादव याचे याच्या आधी प्रदर्शित झालेली सर्व गाणी सुपरहिट ठरली आहेत. भोजपुरी गाण्यांचे चाहते नेहमी प्रमोद याच्या गाण्याची वाट बघतच असतात. आता आलेले हे ‘ट्रकवा वाला’ गाणे यूट्यूबच्या वेव्ह म्युझिक यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे.

या गाण्याला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता, हे गाणे प्रमोदच्या आधी प्रदर्शित झालेल्या सर्व गाण्याचे रेकॉर्ड तोडणार असे वाटत आहे. एक दिवसापूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात प्रमोद ट्रक ड्रायव्हर बनला आहे. गाण्यात प्रमोद यादवचे त्याच्यासोबत असलेल्या अभिनेत्रीसोबत अनेक रोमँटिक सीन्स देखील दाखवण्यात आले आहे. या गाण्याचे म्युझिक, हटके डान्स स्टेप्स आणि प्रमोद प्रेमीची स्टाइल सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. कृष्णा बेदर्दी यांनी लिहिलेल्या या गाण्याला आर्या शर्मा यांनी संगीत दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच स्पाइस रेकॉर्ड्सच्या यूट्यूब चॅनेलवर प्रमोद प्रेमी यादव याचे ‘बंगाल से लायेंगे’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्याला आतापर्यंत ८ लाख पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहे. शिवाय त्याचेच ‘प्यार के भूखल बानी’ हे गाणे देखील सोशल मीडियावर प्रचंड गाजताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे करायला मी खूप घाबरायचे…’, म्हणत व्हिडिओमध्ये ‘तीच’ गोष्ट करताना दिसली ऋता दुर्गुळे

-हा नक्की फोटो आहे की व्हिडिओ? तेजस्विनी पंडितची लेटेस्ट पोस्ट पाहून चक्रावले नेटकरी

-जेव्हा वेगवेगळ्या कलाकारांसोबत ऐश्वर्याने निभावली होती एकच भूमिका; पाहायला मिळाला अभिनेत्रीचा दिलकश अंदाज


Leave A Reply

Your email address will not be published.