पीएम मोदी आणि प्रियांकाच्या भेटीवर झालेल्या वादावर, अभिनेत्रीने आपल्या पुस्तकातून दिले उत्तर


नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचे ‘अनफिनिश्ड’ नावाचे पुस्तक प्रदर्शित केले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून तिने अनेकांना माहित नसलेल्या गोष्टी, घटना सांगितल्या आहेत. शिवाय प्रियांकाने या पुस्तकात तिच्याशी संबंधित अनेक गौप्यस्फोट केले आहेत. सोबतच तिने तिच्याबद्दल लोकांना पडलेल्या अनेक प्रश्नांची आणि तिच्या वादांची उत्तरे देखील या पुस्तकातून दिली आहेत.

प्रियांका चोप्रा २०१७ साली अशाच एका वादात अडकली होती. ज्यामुळे तिच्यावर भयंकर टीका तर झालीच सोबत तिला खूप ट्रोल देखील केले गेले. प्रियंका आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. त्याच फोटोमुळे ती खूप ट्रोल झाली. याच घटनेवर तिने तिच्या पुस्तकातून उत्तर दिले आहे.

प्रियांका चोप्राचा २०१७ साली ‘बेवॉच’ नावाचा एक हॉलिवूडपट आला होता. त्याच्या प्रमोशनसाठी ती बर्लिनमध्ये होती. योगायोगाने प्रधानमंत्री मोदी देखील तेव्हा जर्मनीच्या चॅन्सलर एंजेला मार्केल यांना भेटायला बर्लिनमध्ये होते. यादरम्यान प्रियांका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटली आणि त्यांच्यासोबत तिने एक फोटो काढला. त्यानंतर हा फोटो खूप व्हायरल झाला.

हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीवेळी प्रियंकाने घातलेल्या ड्रेसवर तिला खूप ट्रोल केले. प्रियांकाने या वादाचा मुद्दा तिच्या पुस्तकात देखील सांगितला आहे. तिने या पुस्तकात लिहिले की, “योगायोगाने मी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एकाच हॉटेलमध्ये थांबलो होतो. ही गोष्ट जेव्हा मला समजली, तेव्हा मी प्रधानमंत्री कार्यालयांसोबत संपर्क केला आणि त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.”

त्यानंतर तिला लगेचच वेळ देण्यात आली. ती, तिचा भाऊ आणि तिची अमेरिकन मैत्रीण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले. तेव्हाच हा फोटो कोणीतरी सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यातून मोठा वादंग निर्माण झाला. तिने पुढे लिहिले, “मी हा ड्रेस तेव्हापासून घातला होता जेव्हा मी त्यादिवशी प्रमोशनल सुरुवात केली. माझ्याकडे ड्रेस बदलण्याचा वेळ नसल्याने मी तशीच त्यांना भेटायला गेले.” प्रियांकाच्या या ड्रेसवर अनेक जणांनी तिला ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपत्तीजनक स्वरूपात बसल्याचे सांगितले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत सोनाक्षीने पोस्ट केली भावनिक कविता, पाहा व्हिडिओ
-वाढदिवस! लग्न समारंभात पाहताच क्षणी टीना मुनीम यांच्या प्रेमात पडले होते अनिल अंबानी; असे जुळले होते लग्न
-Video: हेल्मेट न घालता बाईकवर स्टंट करणे जॉन अब्राहमला पडले महागात; नेटकऱ्यांनी शिकवला चांगलाच धडा
-तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ

 


Leave A Reply

Your email address will not be published.