Thursday, June 12, 2025
Home मराठी जांभळ्या रंगाची साडी अन् कपाळी चंद्रकोर, रुपाली भोसलेचा मराठमोळा लूक घालतोय चाहत्यांना भुरळ

जांभळ्या रंगाची साडी अन् कपाळी चंद्रकोर, रुपाली भोसलेचा मराठमोळा लूक घालतोय चाहत्यांना भुरळ

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री रुपाली भोसले ही तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने नेहमीच चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करत आली आहे. अभिनयासोबतच ती तिच्या डान्सने देखील सर्वत्र प्रसिद्ध आहे. रुपाली ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ‘बिग बॉस मराठी २’ नंतर तर तिची लोकप्रियता आणखीनच वाढलेली दिसत आहे. त्यामुळे ती तिच्या चाहत्यांना खुश करण्याची एकही संधी सोडत नाही. ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

रुपाली भोसलेने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही पारंपारिक अंदाजात फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने जांभळ्या रंगाची सुंदर अशी नऊवारी साडी नेसली आहे. यावर तिने हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. हातात हिरवा बांगड्या केसांचा अंबाडा असा साजशृंगार केला आहे. तसेच तिने ऑक्साईड ज्वेलरी घातली आहे. तिने कपाळी लावलेल्या चंद्रकोरीने तिच्या सौंदर्यात विलक्षण भर घातली आहे. (Rupali bhosale share her saree look on social media)

तिच्या चाहत्यांना देखील हा लूक खूप आवडला आहे. अनेकजण हा फोटोवर कमेंट करत आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

रुपाली भोसलेने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटात काम केले आहे. तिने ‘बडी दूर से आये है’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘चांदी’, ‘मुक्ती’, ‘जुबान संभाल के’, ‘आजोबा वयात आले’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पण बिग बॉसने तिला खूप ओळख निर्माण करून दिली. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिचे ‘संजना’ नावाचे पात्र चांगलेच गाजत आहे. या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत आहे, तरी देखील तिची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. या मालिकेत सध्या अनेक वळणं पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा