‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत झाली नवीन एन्ट्री, भानुप्रियाचे रूप पाहून चाहते झाले अवाक


सुंदरा मनामध्ये भरली‘ या मालिकेत अनेक वळणं येत आहेत. प्रेक्षक देखील मालिकेला चांगला प्रतिसाद देत आहेत. मालिकेत असणारा खलनायक दौलत सगळ्यांना खूप त्रास देत आहे. त्यामुळे अभिमन्यू आणि त्याच्या घरातील सगळे कंटाळले आहेत. दौलतने जहांगीरदारांच्या घराचे आणि जमिनीचे पेपर फसवून घेऊन सगळी जमील लुबाडली आहे आणि सगळ्यांना त्याचे गुलाम केले आहे. या सगळ्यात अभिमन्यूच्या आईचा प्राण गेला आहे.

अशातच मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेतील अभिमन्यू त्यांची जमीन परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता तो दौलतकडे बाईच्या वेशात गेला आहे. त्याने भानुप्रीयाचे रुप घेतले आहे आणि तो त्याच्या घरी नोकर म्हणून गेला आहे. त्याचा हा लूक पाहून सगळेच हैराण झाले आहेत. एखाद्या सुंदर स्त्रीला लाजवेल असे त्याचे सौंदर्य दिसत आहे. तसेच तो अभिमन्यू आहे हे देखील ओळखणे अवघड झाले आहे. (sameer paranjape new look in sundra manamadhe bharali)

त्याचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांना त्याचा हा लूक खूप आवडला आहे, अनेकांना अभयची ही स्त्री भूमिका खूप आवडली आहे. त्यामुळे मालिकेत आता काय होणार आहे, हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

या मराठी मालिकेत अक्षया नाईक आणि समीर परांजपे मुख्य भूमिकेत आहे. एक मुलगी जाड असल्याने तिच्या बापाला तिचे लग्न करण्यासाठी किती उंबरठे झिजवावे लागतात, हे या मालिकेत दाखवले आहे. ३४ नकार आल्यानंतर मुलीचे लग्न ठरते पण हुंडा या अनिष्ट प्रथेमुळे मुलीचे लग्न पुन्हा एकदा मोडते. त्यानंतर एका मुलाला लग्नाला उभे राहावे लागते. यानंतर भौतिक गोष्टी सोडून त्यांच्या प्रेम कहाणीला कशी सुरुवात होते हे या मालिकेत दाखवले आहे.

हेही वाचा :

स्पृहा जोशीचा नवीन चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सिद्धार्थ चांदेकरसोबत दिसणार जबरदस्त केमिस्ट्री

अपयश पचनी पडत नसल्याने राजेश खन्ना यांनी एकदा दारूच्या नशेत केला होता आत्महत्येचा प्रयत्न

‘शेवटच्या क्षणापर्यंत राजासारखे जगले’, प्रकाश मेहरांनी दिला राजेश खन्ना यांच्या स्मृतींना उजाळा

 


Latest Post

error: Content is protected !!