…म्हणून शाहरुख खान सुहाना आणि आर्यनला घेऊन जात नाही शूटिंगवर; अभिनेत्याने मुलाखतीत सांगितले कारण

Shahrukh Khan told the reason why he not bring a Suhana and Aryan on his shooting


बॉलिवूडमधील किंग खान अशी ज्याची ओळख आहे तो म्हणजे शाहरुख खान. शाहरुख खान त्याच्या अभिनयाच्या बाबतीत जेवढा गंभीर आहे, तेवढाच गंभीर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही आहे. तो एक जबाबदार वडील आहे. त्याची तिन्ही मुले सुहाना, अबराम आणि आर्यन खान हे नेहमीच चर्चेत असतात. सुहाना आणि आर्यन हे दोघेही चित्रपट सृष्टीपासून लांब आहेत, तरीही सोशल मीडियावर त्यांची तगडी फॅन फॉलोविंग आहे. नुकताच शाहरुख खानने एक किस्सा शेअर केला आहे. जेव्हा सगळ्या लोकांनी त्याच्या कारला घेरले होते आणि हे पाहून सुहाना खूप मोठमोठ्याने रडायला लागली होती.

हा किस्सा शेअर करत त्याने हे देखील सांगितले की, तो अनेक ठिकाणी अबरामला घेऊन जातो पण सुहाना आणि आर्यनला नाही नेत. याचे कारण देखील त्याने स्पष्ट केले होते. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो तिन्ही मुलांसोबत सारखाच व्यवहार करतो. पण सुहाना आणि आर्यनला असे वाटते की, तो अबरामवर खूप प्रेम करतो. यांनतर त्याने सांगितले की, सुहाना आणि आर्यन हे दोघे लहानपणापासूनच खूप लाजाळू आहेत, त्यामुळे तो त्यांना घेऊन जास्त कुठे जात नाही.

शाहरुख खानने 2015 मध्ये न्यू इंडियन एक्स्प्रेस सोबत बोलताना सांगितले की, “जेव्हा सुहाना आणि आर्यन मला म्हणाले की, ‘पप्पा तुम्ही अबरामवर खूप जास्त प्रेम करता.’ त्यावेळी मी म्हणलो की, ‘मी तुमच्यावर प्रेम करत नाही ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली? जेव्हा तुम्ही त्याच्या वयाचे होता, तेव्हा तुमच्यावर देखील मी तेवढेच प्रेम करत होतो.'” त्याने सांगितले की, “मी एक शिस्तप्रिय वडील आहे. अबराम माझ्यासोबत नेहमीच बाहेर येतो पण माझी दोन मुलं जरा लाजाळू आहेत.”

शाहरुख खानने पुढे सांगितले की, “माझा मुलगा आर्यनला कार जास्त आवडत नाही, त्यामुळे तो अगदी कधीतरीच माझ्या शूटिंगवर येत असे. जेव्हा सगळेजण कारभोवती घोळका घालायचे, तेव्हा तो खूप घाबरत असे. सुहाना तर अगदी रडायला लागायची. त्यामुळे मी त्यांना जास्त कुठे घेऊन जात नसत.”

अबराम मागील काही दिवसात शाहरुख खानसोबत अनेक ठिकाणी गेला आहे. त्याने आयपीएलमध्ये देखील शाहरुख खानसोबत एन्जॉय केले आहे. तो अनेकवेळा स्टेडियममध्ये शाहरुख खानसोबत फिरताना दिसला होता. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.