राज कुंद्राच्या पहिल्या घटस्फोटावरील खुलासानंतर, सोशल मीडियावर शिल्पाची सूचक पोस्ट; म्हणतेय, ‘…थोडे असुरक्षित वाटू लागते’


कलाकार नेहमीच त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यसाठी देखील चर्चेत येत असतात. किंबहुना लोकांना कलाकारांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्यांच्या वैयक्तिक जीवनातच जास्त रस असतो. अनेकदा मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक नव्या जुन्या घटना नेहमी व्हायरल होत असतात. सध्याच्या घडीला शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा त्याच्या पहिल्या लग्नामुळे आणि घटस्फोटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

नुकतेच त्याने त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल त्याची बाजू मांडत काही गोष्टींचा खुलासा केला. त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की त्याच्या पहिल्या पत्नी कविताचे त्याच्याच बहिणीच्या पतीसोबत अफेअर होते आणि याच कारणामुळे राज आणि कविताचा घटस्फोट झाला. राज कुंद्राच्या या खुलाश्यानंतर आता शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर की पोस्ट ठेवली आहे. या पोस्टमध्ये एका पुस्तकाची पाने असून, त्यावर जो मजकूर आहे तो या सर्व प्रकरणावर सूचक ठरत आहे.

Photo Courtesy: Instagram/theshilpashetty

शिल्पाने ठेवलेल्या इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे, “दुःख वाटा, एकांतात कधीच चांगुलपणा नसतो. चांगुलपणातील प्रत्येक पाऊल हे अधिक चांगल्यासाठी योगदान देते. जेव्हा आपण काही चांगले काम करण्यास उशीर करतो तेव्हा आपल्या सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा आपण चांगल्या लोकांसोबत वाईट गोष्टी घडत असल्याचे पाहतो किंवा ऐकतो आणि तरीही आपण काहीही करत नाही. कारण त्या घटना आपल्याला खूप दूरच्या वाटतात. जेव्हा एखाद्या चांगल्या व्यक्तीवर जगात कोठेही हल्ला होतो, कोणी जखमी होते, कोणाला अटक होते, तुरूंगात टाकले जाते तेव्हा आपणास थोडे असुरक्षित वाटू लागते.” (shilpa shetty instagram post on raj kundra first divorce controversy)

शिल्पा शेट्टीने ही पोस्ट राज कुंद्राने केलेल्या खुलासानंतर टाकल्याने. ती राज आणि त्याच्या वक्तव्यासाठी साठीच असल्याचे बोलले जात आहे. राजने त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, त्याला हे सर्व तेव्हाच सांगायचे होते जेव्हा शिल्पावर घर तोडल्याचे आरोप होत होते. मात्र तेव्हा तो शिल्पाच्या सांगण्यावरूनच शांत राहिला होता. मात्र आता डोक्यावरून पाणी गेल्याने राजने शिल्पाला निर्दोष म्हणत त्याच्या घटस्फोटाचे खरे कारण सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू ऐलराधा, तू पैल संध्या!’ पाहा निसर्गाच्या सानिध्यात हरवलेल्या मृण्मयी देशपांडेची नैसर्गिक सुंदरता

-‘आयुष्यात विस्कटलेल्या गोष्टी गुंडाळता येत नसतील, तर…’, सुंदर फोटोवर ‘स्वीटू’ने लिहिलं लक्षवेधी कॅप्शन

-‘सनीचा हॉट आणि शानदार शॉट!’ अभिनेत्रीने केला ग्लॅमरस फोटो शेअर; मिळाले १४ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स


Leave A Reply

Your email address will not be published.