अरे बापरे! लग्नानंतर पहिल्यांदाच झाले नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगमध्ये भांडण, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल


बॉलिवूड गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांची जोडी चाहत्यांमध्ये चांगलीच पसंत आहे. नेहाने आतापर्यंत आपल्या आवाजाने असंख्य गाणी गायिली आहेत. नेहाचे गाणे ऐकण्यासाठी चाहते कायम आतुर असतात, तर रोहनप्रीत देखील एक गायक आहे. ते आपले प्रेम हे त्यांच्या व्हिडिओतून नेहमीच शेअर करतात. परंतु आता त्यांचा एक चकित करणारा व्हिडिओ समोर आला आहे.

मागील वर्षी ऑक्टोबर, २०२०मध्ये गायिका नेहाने रोहनप्रीत सिंग बरोबर लग्न केले आहे. नेहा कक्करने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. यातून त्यांच्या प्रेमाची झलक पाहायला मिळत आहे.

नेहाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता की, नेहा रोहनला जाण्यास सांगताना दिसत आहे. यावर रोहन वारंवार नेहाच्या डोक्यावर मारताना दिसत आहे, ज्यामुळे नेहाला खूप राग आलेला दिसतो. यानंतर नेहानेही रोहनला रोखून मारले आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला एक गाणे ऐकू येत आहे.

हे गाणे शेअर करत नेहा म्हणाली की, ‘#Khad Tainu Main Dassa.’ यावरून समजते की, हे दोघे तिच्या नवीन गाण्याची प्रसिद्धी करत आहेत. ‘खड तैनू मैं दस्सा’ हे गाणं नेहा आणि रोहनप्रीत सोबत गात आहेत. या दोघांचा हा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे.

अलीकडे नेहाने या गाण्याचे पोस्टर शेअर करताना लिहिले की, ‘तुमची नेहु आणि माझा रोहनप्रीत यांच्या गाण्यातील खड तैनू मैं दस्साचे पहिले पोस्टर.’ या गाण्याच्या पोस्टरमध्ये दोघेही, फुटबॉलच्या मैदानावर स्पोर्टी लूकमध्ये दिसत आहेत. पोस्टरवर नेहा कक्कर विरुद्ध रोहनप्रीत सिंग लिहिले आहे. नेहाच्या या नवीन कर्णधाराने, गाण्याचे गीत लिहिले आहे, आणि व्हिडिओला संगीत अगम-अजीम, यांनी दिग्दर्शित केले आहे.

याआधी नेहा आणि रोहनप्रीत दोन गाण्यांमध्ये दिसले आहेत. नुकतेच नेहा आणि रोहनचे गाणे ‘अपना ख्याल रख्या कर’ खूप प्रसिद्ध झाले होते. या गाण्याला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. यातच हे दोघे पुन्हा चाहत्यांना, आणखी एक उत्तम गाणे देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चाहते गाण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अमिताभ बच्चन यांच्या बालपणीचे पात्र साकारून नाव कमावणारा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झाला अचानक गायब, आता करतो तरी काय?

-पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी रणधीर कपूर होणार नवीन घरात शिफ्ट, आपल्या जुन्या घराबाबत उघड केले ‘हे’ गुपीत

-राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…


Leave A Reply

Your email address will not be published.