Thursday, June 13, 2024

लेटेस्ट व्हिडिओत सुंदरीसोबत झोपल्याने अब्दू जोरदार ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘भावा, विसरू नकोस तू एक…’

प्रसिद्ध गायक अब्दू रोजिक याने ‘बिग बॉस 16‘ शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर तो घराघरात ओळखला जाऊ लागला. त्याचा क्यूटनेस, गोड स्मितहास्य आणि लहान उंचीने त्याने सर्वांना आपल्या प्रेमात पाडले आहे. अब्दू शो जिंकू शकला नाही, पण त्याने कोट्यवधी लोकांची मने नक्कीच जिंकली. चाहत्यांमध्ये त्याने चांगली प्रतिमा तयार केली आहे. मात्र, नुकतेच अब्दूने असा काही व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामुळे त्याची सकारात्मक प्रतिमा मलीन होण्याची चिन्हे दिसत आहेत.

अब्दू रोजिक लेटेस्ट व्हिडिओ
अब्दू रोजिक (Abdu Rozik) हा 19 वर्षांचा आहे. तो सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करतो. तसेच, चाहत्यांना आपल्याविषयी माहितीही देत असतो. इंस्टाग्रामवर तो वेगवेगळे रील्सही बनवतो, ज्यावर त्याला नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, यावेळी त्याने असा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यावर त्याचे कौतुक होण्याऐवजी त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे.

ताजिकिस्तानी गायक अब्दूने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये तो एक मुलगी आणि एक मुलाच्या ब्लँकेटच्या आत आहे. दोघेही जवळपास खूपच कमी कपड्यांमध्ये झोपले आहेत. जेव्हा पहिला मुलगा बेडवरून उतरतो, त्यानंतर काही वेळाने अब्दूही बेडवरून खाली उतरताना दिसतो. यावेळी तो अंडरवेअर घातल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ तसा मजेशीर आहे, पण अब्दूच्या चाहत्यांना त्याचा हा व्हिडिओ अजिबात आवडला नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abduroziq Official (@abdu_rozik)

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एका युजरने कमेंट करत लिहिले की, “तुझ्या प्रतिमेसाठी हे चांगले नाहीये.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “असे करू नको. तू मुस्लिम आहेस अब्दू. अशाप्रकारचे व्हिडिओ पोस्ट करू नको.” आणखी एकाने असेही लिहिले की, “भावा, विसरू नकोस तू एक क्रिएटर आहेस. ते तुला अशा गोष्टींमध्ये ओढतील, पण यामध्ये अडकू नको.”

अब्दू रोजिकची गाणी
‘बिग बॉस 16’मधून बाहेर पडल्यानंतर अब्दू रोजिक याचे ‘प्यार’ हे गाणे रिलीज झाले होते. याव्यतिरिक्त ‘छोटा भाईजान’,  ‘यू वेरी चालाक ब्रो’, ‘ओप्पा ओप्पा’ यांसारखे अनेक अल्बम अब्दूने रिलीज केले आहेत. (singer abdu rozik faces backlash for latest post fans reactions goes viral)

महत्त्वाच्या बातम्या-
‘पूजा हेगडेने आत्म’हत्या करण्याचा प्रयत्न केला’, म्हणणाऱ्या युजरवर अभिनेत्रीचा संताप, पाठवली कायदेशीर नोटिस
रेखाला ‘हडळीण’ म्हणत नर्गिसने केलं होतं धक्कादायक विधान; म्हणालेली, ‘ती मर्दांना असे इशारे करायची जसे…’

हे देखील वाचा