सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने पुन्हा एकदा केले वक्तव्य; म्हणाली, ‘माहिती नाही, माझ्यानंतर किती गर्लफ्रेंड झाल्या…’


बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले आहे. अनेक अभिनेत्रींसोबत डेट करून आजही सलमान सिंगल आहे. त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली सोबतचे त्याचे रिलेशन खूप चर्चेत होते. सोमी सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार होती. परंतु काही कारणामुळे ते शक्य झाले नाही. त्या चित्रपटाचे नाव ‘बुलंद’ होते. या चित्रपटाच्या बंद होण्यापूर्वी शूटिंगसाठी सलमान आणि सोमी हे काठमांडूला गेले होते.

सोमी अलीने आता इंडस्ट्रीमधील अनेक जुन्या गोष्टींचा खुलासा केला आहे. ई-टाईम्ससोबत बोलताना तिने सलमान खानसोबत असणाऱ्या रिलेशनबाबत देखील सांगितले. (Somy ali says I don’t know how many girlfriends Salman Khan has since I left)

तिने सलमान खानवर फसवणुकीचा आरोप लावला आहे. तिने सलमान खानसोबत असणाऱ्या रिलेशनबाबत बोलताना सांगितले की, “सलमान खानने त्याचे प्रॉडक्शन हाऊस चालू केले होते. चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्रीचा शोध चालू होता. ज्यासाठी मला निवडले होते. त्या चित्रपटाचे नाव ‘बुलंद’ असे होते. चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्ही काठमांडूला गेलो होतो. पण नंतर शूटिंग थांबवली होती.”

जेव्हा तिला त्यांच्या रिलेशनबाबत प्रश्न विचारले, तेव्हा ती म्हणाली की, “गेल्या पाच वर्षात आमचा काहीच संपर्क झाला नाही. मला असे वाटत की, आता पुढे जाणे गरजेचे आहे. आम्ही दोघेही आता आमच्या आयुष्यात पुढे गेलो आहोत. मला नाही माहित १९९९ साली आम्ही वेगळे झाल्यानंतर त्याच्या किती गर्लफ्रेंड झाल्या आहेत. तरीही मला त्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत. मला माहित आहे की, त्याचे एनजीओ खूप चांगले काम करत आहे. त्याचे फाऊंडेशन ‘बिईंग ह्युमन’वर मला गर्व आहे.”

चित्रपटात परत येण्याबाबत तिला प्रश्न विचारला, तेव्हा ती म्हणाली की, जर तिला चांगला रोल मिळाला तर ती परत इंडस्ट्रीमध्ये येण्याचा नक्कीच विचार करेल.

सोमी अली ही चित्रपटसृष्टीपासून दूर झाली आहे आणि समाज सेवेमध्ये रुजू झाली आहे. घरगुती अत्याचार झालेल्या महिलांना ती खूप मदत करत असते. तिच्या एनजीओचे नाव ‘नो मोर टिअर्स’ हे आहे. याद्वारे ती अनेक महिलांना मदत करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा

-अरे बापरे! ‘इंडियन आयडल १२’मध्ये पवनदीपकडून झाली मोठी चूक; परीक्षकांच्याही उंचावल्या भुवया

-ट्रान्सफॉर्मेशन असावे तर असे! रवी दुबेने ‘इतक्या’ वेळेत कमी केले १० किलो वजन; तुम्हालाही बसणार नाही विश्वास


Leave A Reply

Your email address will not be published.