‘जरा नटावं म्हटलं’, मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीची लग्नानंतरची पहिली वहिली वटपौर्णिमा; खास फोटो केले शेअर


आज (24 जून) वटपौर्णिमा. सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी आज प्रत्येक विवाहित महिला प्रार्थना करत आहेत. वडाची पूजा करत आहेत. यात मराठी अभिनेत्री पण काही मागे नाही बरं का! आजच्या दिवशी अनेक अभिनेत्री त्यांच्या या खास दिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. यातच मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी हिने वटपौर्णिमेनिमित्त काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Sonalee kulkarni share her first vat paurnima photo on social media)

सोनाली कुलकर्णीने हे फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने लाल रंगाची साडी घातली आहे. कपाळावर लाल टिकली, हातात बांगड्या आणि मंगळसूत्र घातलेले दिसत आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. वेगवेगळ्या पोझ देत तिने हे फोटो काढले आहेत. हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “आज वटपौर्णिमा… माझी पहिलीच.. जरी साजरी करता येत नसली तरी जरा नटावं म्हटलं. बाकी नवऱ्याला उत्तम, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.”

सोनालीच्या हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत. अनेक युजर या फोटोला पसंती दर्शवत आहेत. अनेक कलाकारांनी देखील तिच्या या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक केले आहे.

सोनालीने मागच्याच महिन्यात कुणाल बेनोडकर याच्याशी लग्न केले आहे. त्या दोघांनी अत्यंत साध्या पद्धतीने त्यांचा लग्न सोहळा पार पाडला आहे. लग्नानंतरची सोनालीची ही पहिलीचं वटपौर्णिमा आहे. त्यामुळे ती खूपच आनंदी आणि उत्सुक होती.

सोनाली मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची नायिका आहे. ती अभिनयासोबत उत्कृष्ठ डान्स देखील करते. तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘महाराष्ट्राची डान्सिंग क्वीन’ हा रियॅलिटी डान्स शो जज देखील केला आहे. तिने ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी, ‘पोस्टर गर्ल्स’, ‘क्लासमेट’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाची ऑनस्क्रीन सासूसोबत आहे खास मैत्री; भावना व्यक्त करत म्हणाली…

-आमिर खानच्या ‘या’ चित्रपटात झळकली होती कपिल शर्माची ‘ऑनस्क्रीन’ पत्नी सुमोना चक्रवर्ती; आज आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण

-कपूर खानदानाप्रमाणेच धर्मेंद्र यांचाही होता मुलीच्या डान्स आणि चित्रपटात काम करण्याला विरोध; ‘अशाप्रकारे’ झाले तयार


Leave A Reply

Your email address will not be published.