एकच फाईट वातावरण टाईट! सोनू सूदच्या सेक्रेटरीने विचारला माकडे पकडण्याचा खर्च; वन विभागाने लगेच पकडली माकडे

Sonu Sood's Secretary Asked For The Expenses The Forest Department Caught The Monkey Know The Whole Matter


नुकतेच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदकडे एका चाहत्याने त्याच्या गावातील माकडे पकडून जंगलात सोडण्याची विनंती केली होती. यानंतर त्या चाहत्याच्या ट्वीटची जरी थट्टा उडवली जात असली, तरी सोनू सूदने यावर लक्ष देत त्याची समस्या सोडवली आहे.

सोनू सूदच्या सेक्रेटरीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून माकडे पकडण्यासाठीचा खर्च विचारत अकाऊंट नंबर मागितला होता. यानंतर वन विभागाचे अधिकारी स्वत:च हे काम हाती घेत माकडांना पकडण्यासाठी गावात गेले. बुधवारी (१० फेब्रुवारी) माकडांना पकडून गोरखपूरच्या कुसम्ही जंगलात नेऊन सोडले.

यानंतर सोनू सूदने ट्वीट करत म्हटले की, “आतातर माकडेही पकडली, आता बोला.”

लॉकडाऊनदरम्यान सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या सोनू सूदने अनेक गरजू व्यक्तींना त्यांच्या गावी पाठवले. ट्विटरवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे त्याचे काम अजूनही सुरूच आहे.

चाहत्याने सोनू सूदकडे मागितली होती मदत
खरं तर बासू गुप्ता नावाच्या सोशल मीडिया वापरकर्त्याने आपल्या गावातील माकडांच्या हैदोसामुळे चिंतेत येऊन सोनू सूदकडे मदत मागितली होती. ही समस्या जाणून घेतल्यानंतर स्वत: सोनूही आश्चर्यचकित झाला होता.

बासू गुप्ताने ट्वीट करत लिहिले होते की, ‘सोनू सूद सर आमच्या गावात बबून माकडांच्या हैदोसामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. तुम्हाला विनंती आहे की, माकडांना आमच्या गावातून दूर जंगलामध्ये पाठवावे.’

यावर अभिनेता सोनू सूदनेही आश्चर्यचकित करणारे प्रत्युत्तर दिले होते. त्याने लिहिले होते की, ‘आता फक्त माकडांना पकडणेच बाकी राहिले होते मित्रा. पत्ता पाठव, हेही करून पाहुया.’

त्यानंतर बासू गुप्ताने पत्ता पाठवल्यानंतर सोनू सूदच्या सेक्रेटरीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करत माकडे पकडण्यासाठी येणारा खर्च मागितला होता.

त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगात काम सुरू केले आणि दुदहीच्या मुबारक अली टीमला माकडे असणाऱ्या गावात पाठवण्याचे आदेश दिले. टीमने त्या ठिकाणी जाऊन माकडांना पकडले आणि कुसम्ही जंगलात नेऊन सोडले. असे म्हटले जात आहे की, लाज वाचवण्यासाठी वन विभागाने असे केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ
-हॅप्पी बर्थडे! हॉट आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेले ३ धक्कादायक खुलासे, ज्यांनी बॉलिवूडमध्ये घातला होता धुमाकूळ
-डायरेक्टरने प्रियांका चोप्राला दिला होता सर्जरी करून फिगर ठीक करण्याचा सल्ला; अभिनेत्रीने आपल्या पुस्तकात केला धक्कादायक खुलासा
-वाढदिवस विशेष! इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून कुमार विश्वास बनले ‘कवी’, ‘चाय गरम’ चित्रपटात केला होता अभिनय
-सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
-‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य
-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो
-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.