मातृदिनानिमित्त अभिनेत्रींनी दिल्या हटके शुभेच्छा! आईने दिलेली शिकवण ‘ही’ अभिनेत्री आणते दररोज अमलात


आई ही देवाने निर्माण केलेली सर्वात प्रेमळ, आणि सुंदर गोष्ट आहे. जी अगदी निस्वार्थपणे आपल्या मुलांवर भरभरून प्रेम करत असते. आईविषयी लिहावे तेवढे कमीच आहे. कारण तिचे प्रेम हे शब्दात मांडणे कठीणच आहे. दरवर्षी मे  महिन्याचा दुसरा रविवार म्हणजे मातृदिन होय. अमेरिकेपासून सुरुवात झालेला हा मातृदिन आज सर्वत्र ९ मे रोजी मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे.

या खास प्रसंगी बॉलिवूड कलाकारांनी आपल्या आईसह, त्यांचे फोटो शेअर करुन, आपल्या भावना व्यक्त करत आहेत. माधुरी दीक्षित, सुष्मिता सेन, आणि कियारा अडवाणी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. चला तर कलाकारांनी मातृदिनाच्या दिवशी आपल्या दिलेल्या हटके शुभेच्छांवर एक नजर टाकूया…

कलाकारांनी मातृदिनानिमित्त सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या आईबरोबर एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले, ‘मी तुझ्याकडून बरेच काही शिकले आहे, आणि मी अजूनही ते दररोज अमलात आणते.’

मातृदिनानिमित्त सुष्मिता सेनने, एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. तिने तिची आई आणि दोन्ही मुलींचा फोटो पोस्ट केला आहे.

ऋषी कपूर, आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूरने इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, ‘मी एक सशक्त स्त्री आहे, कारण एका बलवान महिलेने मला वाढवले ​​आहे. हॅप्पी मदर्स डे माय आयरन लेडी (खंबीर स्त्री). तुझ्यावर खूप प्रेम आहे.’

कियारा आडवाणीनेही आपल्या आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. तिने लिहिले आहे की, “असं काही नाही की, तुमची आई बरे करू शकत नाही. सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

रवीना टंडनने सर्व मातांना अभिवादन केले आहे.

तिने तिची आई, आणि मुलींसोबत एक फोटो पोस्ट केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी भाडे देण्यासाठी नव्हते विजयकडे पैसे, आज आहे करोडो रुपयांचा मालक, ‘या’ कारणामुळे विकला होता पहिला फिल्मफेअर अवॉर्ड

-श्वास रोखून धरा! तब्बल १०० कोटी रुपये घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री

-Mother’s Day Special: नेहापासून ते नताशापर्यंत लग्नाच्या ९ महिन्यांपूर्वीच आई बनणाऱ्या अभिनेत्री, मलायकाच्या बहिणीचाही समावेश


Leave A Reply

Your email address will not be published.