सुनील ग्रोव्हर पुन्हा एकदा दिसणार कपिल शर्मासोबत? वाचा काय म्हणाला कॉमेडियन


टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’ होय. हा शो खूप चर्चेत आहे. यातील विनोदी कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या शोमधील सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा यांची काही वर्षांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी भांडण झाल्याची बातमी समोर आली होती. यानंतर त्या दोघांचे मार्ग वेगळे झाले होते. त्यांनतर ते दोघे चर्चेत आले होते, पण आता पुन्हा खूप दिवसांनी सुनील पुन्हा एकदा त्यांचे सगळे वाद विसरून कपिल शर्मा शोमध्ये येणार आहे अशी चर्चा चालू आहे.

आरजे सिद्धार्थ कन्ननसोबत बोलताना सुनीलला विचारले होते की, तो कपिल शर्मा शोबद्दल काय विचार करतो? त्याला पुन्हा एकदा कपिल शर्मा शोमध्ये काम करण्याची इच्छा आहे का? सुनीलने या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, “सध्या तरी काम करण्याचा काही प्लॅन नाहीये. पण एखाद्या दिवशी संधी मिळाली, तर आम्ही दोघे नक्कीच काम करू.”

सुनील ग्रोव्हरने आता बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. कपिल शर्माच्या वाढदिवशी त्याने शुभेच्छा देखील दिल्या होत्या. त्याने ट्विटरवर कपिलला शुभेच्छा दिल्या होत्या. कपिलने देखील त्यावर प्रतिक्रिया दिली होती.

सन 2017 मध्ये कपिल आणि सुनीलमध्ये वाद झाले होते. त्यानंतर अनेक दिवस ते एकमेकांशी बोलत नव्हते. पण आता त्या दोघांनी ही सगळं विसरायचं ठरवलं आहे. त्यांच्या या वादानंतर ते 2019 मध्ये सोबत एका कार्यक्रमात दिसले होते.

कपिल शर्माने 2020 मध्ये एका कार्यक्रमात सांगितले होते की, “छोट्या छोट्या गोष्टी होत असतात. पण त्याने काही नातं संपत नाही. सुनील एक कमालीचा कलाकार आहे. मी जेव्हा वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करतो, तेव्हा मला जाणवते की, मला अजून खूप काही शिकायचे आहे. मी सुनीलकडून खूप काही गोष्टी शिकलो आहे. भविष्यात जर आम्हाला पुन्हा काम करण्याची संधी मिळाली तर खूप मज्जा येईल.”

सुनील आणि कपिलने दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर आता ते दोघे एकत्र काम करतील अशी आशा चाहत्यांना आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंडियन आयडल १२’मधील अमित कुमार वादावर अभिजीत भट्टाचार्य यांचा शोला पाठिंबा; म्हणाले, ‘त्यांनी कॅमेऱ्यासमोर…’

-कियारा आडवाणीचा बिकिनीतील व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, करतेय ‘या’ गोष्टीला मिस

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.