‘आता देवच आम्हाला एकत्र आणू शकतो’, शाहरुख खानसोबत भांडण झाल्यानंतर सलमान खानने दिली होती प्रतिक्रिया

Superstar Salman Khan And Shahrukh Khan Patchup Story After Fight


बॉलिवूडमध्ये असे दोन सुपरस्टार आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दोघांनीही आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांचा चाहतावर्गही कमालीचा मोठा आहे. या दोघांनीही ‘करण अर्जुन’ आणि ‘हम तुम्हारे हैं सनम’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु सन २००८ मध्ये कॅटरिना कैफच्या वाढदिवशी दोघांमध्ये चांगलेच भांडण झाले. यानंतर ते अनेक वर्षे एकमेकांशी बोलले नव्हते.

यानंतर एका मुलाखतीतदरम्यान सलमान खानने म्हटले होते की, “आता देवच आम्हाला एकत्र आणू शकतो आणि असे कधीच होणार नाही.” सलमानने म्हटले होते की, त्याला वाटायचे शाहरुख खानची चुकी आहे आणि शाहरुखला वाटायचे की, तो चुकीचा आहे. सलमान असेही म्हणाला होता की, तो शाहरुखवर मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करत होता, परंतु त्याने दु:ख दिले.

मैत्री कायम ठेवू नाही शकत शाहरुख खान
सन २०११ मध्ये शाहरुख खानने स्वीकारले होते की, तो मैत्रीच्या बाबतीत चांगला नाहीये. ‘कॉफी विथ करण’मध्ये करण जोहरने शाहरुख खानला विचारले होते की, “सलमान खानला तुझ्यापासून काही समस्या आहे, असे तुला वाटते का? कारण तुम्ही मैत्री करून राहू शकत नाहीत?” यावर शाहरुखने म्हटले होते की, “हो मी मैत्री कायम ठेवू शकत नाही. मला नाही माहिती मैत्री कशी कायम ठेवतात.”

शाहरुख खानने मान्य केली चूक
शाहरुखने म्हटले होते की, “जर सलमान खानला माझा त्रास आहे, तर १०० टक्के मीच त्याला असे करण्यास प्रवृत्त केले असेल. फराहला माझा त्रास आहे, मी तिला निराश केले असेल. मला वाईट वाटते की, मी लोकांना निराश करतो. सर्वात मजेशीर गोष्ट जी मी मला माहिती आहे की, माफी कशाला म्हटले जाते. मी कधीही स्वत: ला सॉरी म्हणत नाही.”

इफ्तार पार्टीमध्ये झाले पॅचअप
सन २०१३ मध्ये बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये दोन्ही सुपरस्टारमध्ये पॅचअप झाले. यानंतर सलमान आणि शाहरुख कबीर खानच्या ‘ट्यूबलाईट’ चित्रपटात दिसले होते. आनंद एल राय यांच्या ‘झिरो’ या चित्रपटातही दोघेही दिसले होते. आता ‘पठाण’ या चित्रपटात सलमान आणि शाहरुख खान पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वत: शाहरुख खानने मुलगा आर्यनला घरात विना शर्ट फिरण्यावर घातली होती बंदी, कारण जाणून तुम्हीही म्हणाल, ‘योग्य निर्णय!’

-जेव्हा १६ वर्षीय जन्नत झुबेरच्या किसींग सीनवर भडकली होती आई, वडिलांनी दिली होती अशी प्रतिक्रिया

-‘तेव्हा खिसा रिकामा असायचा, पण…’, म्हणत कपिल शर्माने शेअर केला २३ वर्ष जुना फोटो, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ


Leave A Reply

Your email address will not be published.