‘तुझी खूप आठवण येत राहील हेमंत!’, कोरोनामुळे चाहत्याचा मृत्यू झाल्यानंतर सुपरस्टार विजय देवरकोंडाने शेअर केली भावुक पोस्ट

Telugu superstar Vijay Deverakonda's emotional post to remembering his


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. आता देखील तो त्याच्या एका पोस्टमुळे सर्वत्र चर्चेत आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने त्याच्या एका चाहत्याची आठवण काढली आहे. त्याच्या या चाहत्याला कोरोना झाला होता. अनेक दिवसांपासून तो हॉस्पिटलमध्ये होता.

विजयच्या या चाहत्याने त्याच्याशी बोलण्याची शेवटची ईच्छा मांडली होती. ती विजयने पूर्ण देखील केली आहे. तो बराच वेळ त्याच्या चाहत्याशी व्हिडिओ कॉलवर बोलत होता. त्यांच्या या संभाषणानंतर काही वेळाने त्याने प्राण सोडले होते. त्याच्या या चाहत्याच्या आठवणीत विजयने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून त्याला श्रद्धांजली अर्पण केली होती.

विजयने त्याच्या फेसबुकवर ही पोस्ट शेअर करून लिहिले होते की, “मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की, माझे तुझ्या सोबत बोलणे झाले. त्याच्या चेहऱ्यावरील ती स्माईल मला पाहायला मिळाली. तू माझ्यावर करत असलेले प्रेम मी अनुभवले आणि तुला देखील तेवढेच प्रेम देण्याचा प्रयत्न केला आहे. मी त्या सगळ्यांचे आभार मानतो, ज्यांनी तुझ्याशी माझा संपर्क करून देण्यासाठी प्रयत्न केले. तुझी खूप आठवण येत राहील हेमंत!! मला असे वाटते की, तुझी आठवण आणि तू नेहमीच माझ्या टाईमलाईनवर असायला पाहिजे.”

तेलुगु अभिनेता विजय देवरकोंडा या दिवसात त्याच्या ‘लायगर’ या चित्रपटामुळे लाईमलाईटमध्ये आहे. या चित्रपटाची शूटिंग तो मुंबईमध्येच करत आहे. तसेच त्याला अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत स्पॉट केले गेले आहे. केवळ 31 व्या वर्षी विजयचे इंस्टाग्रामवर 11.6 मिलियन पेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! ‘बिग बॉस’ फेम निक्की तांबोळीच्या भावाचे कोरोनाने निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती

-‘माझ्या देशाला ऑक्सिजनची गरज आहे’, म्हणत सोनू सूदने हात जोडून केले विनंती

-अरे व्वा! लग्नासाठी मुलगा शोधतेय अभिनेत्री सान्या मल्होत्रा; म्हणाली, ‘…तर मला फोन करा’


Leave A Reply

Your email address will not be published.