Monday, April 27, 2026
Home साऊथ सिनेमा पुन्हा एकदा वादात अडकला थालापती विजय, इंपोर्टेड लग्जरी कार खरीदनं पडली महागात

पुन्हा एकदा वादात अडकला थालापती विजय, इंपोर्टेड लग्जरी कार खरीदनं पडली महागात

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता थालापती विजय (Thalapathy Vijay) हा त्याच्या आलिशान जीवनामुळे नेहमीच चर्चत असतो. काही महिन्यापुर्वी त्याने लग्जरी कार खरेदी केली होती. पण आता ती कार विकत घेणे खूपच महागात पडलेलं दिसतंय. त्याला न्यायालायाकडुन कार कर भरण्याबाबतीत आदेश केले होते. तेव्हा विजयने या घटनेला कर भरून टाळले होते. लग्जरी कारमुळे परत एकदा तो चर्चत आला आहे. त्याने अमेरिकेतून २००५ मध्ये ६३ लाखाची कार खरेदी केली होती. तमिळनाडू सरकारच्या व्यावसायिक कर विभागाने त्याला या गाडीचे कर भराण्यास सांगितले होते. आता विजयकडून मद्रास उच्च न्यायालयाकडून हे कर रद्द करण्यासाठी खटला दाखल करण्यात आला.

सप्टेंबर २०२१ मध्ये, त्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ७ लाख ९८ हजार ७५ रुपये प्रवेश कर म्हणून भरला होता. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये कर न भरल्याबद्दल वाणिज्य कर विभागाकडून अंतरिम कालावधीसाठी ३० लाख २३ हजार ६०९ रुपयांच्या दडांची मागणी करण्यात आली होती. आता या प्रकरणाची सुनावणी शेवटच्या दिवशीच झाली. यादरम्यान विजयच्या वकिलाने न्यायालयात दावा केला आहे की, कार खरेदी करताना त्याला दरमहा केवळ २ टक्के दंड आकारण्यात जाईल असे सांगितले होते. पण नंतर त्याला ४०० टक्के दंड ठोठावण्यात आला. परंतु व्यवसायिक कर विभागाने हे प्रकरण फेटाळुन लावले आणि दंड आकारावा अशी विनंती न्यालायाला केली आहे. या सर्व गोष्टीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, तो पुन्हा एकदा कर वादातून जात आहे. चाहत्यांना त्याची चिंता लागली असून, हे प्रकरण लवकरच संपवेल अशी आशा आहे.

विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो आगामी चित्रपट ‘थलापती ६६’ बद्दलही चर्चेत आहे. या चित्रपटासाठी त्याने राष्टीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक वामासी पडिपल्ली यांच्याशी हात मिळवले आहे. काही वृत्तानुसार, त्याच्यासोबत पुजा हेडगे, कियारा आडवानी दिसणार असल्याची चर्चा होती. परंतु आता यात रश्मिका मंदाना दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा 

हे देखील वाचा