‘तू म्हाताऱ्या अभिनेत्यासोबत खूप भयानक दिसते’, दिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ‘या’ अभिनेत्याचा सलमानला टोला


बॉलिवूडमधील ‘नॅशनल क्रॅश’ अशी जिची ओळख आहे, ती म्हणजेच दिशा पटानी. दिशा पटानी रविवारी (13 जून) तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत तिने ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिने बॉलिवूडमध्ये तिचे चांगलेच नाव कमावले आहे. तिने अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिला सगळेजण शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर तिला तिचे चाहते आणि कलाकार शुभेच्छा देत आहेत. या निमित्त अभिनेता कमाल राशिद खान याने देखील दिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच त्याने तिला कामाबाबतीत संदेश दिला आहे. या सोबतच इशाऱ्यात पुन्हा एकदा सलमान खानच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाची खिल्ली उडवली आहे.

केआरकेने केलेल्या ट्विटमध्ये दिशा पटानीच्या ‘बाघी 2’ चित्रपटातील तिचा सहकलाकार आणि कथित बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ याच्याबाबत एक संदेश दिला आहे. त्याने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “डियर दिशा पटानी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू म्हाताऱ्या अभिनेत्यासोबत खूप भयानक दिसते. त्यामुळे कृपया फक्त टायगर श्रॉफसोबत काम कर.” या ट्विटमध्ये त्याने दिशा आणि टायगर शिवाय इतर कोणाचेच नाव घेतले नाही.

परंतु युजरने हे ट्वीट पाहून असा अंदाज लावला आहे की, नेहमी प्रमाणेच तो अप्रत्यक्षपणे सलमान खानवर निशाना साधत आहे. कारण दिशाचा ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. केआरकेने या चित्रपटाबाबत त्याचे रीव्ह्यू ट्विट केले होते. तसेच सलमान खानबाबत ही अनेक ट्वीट केले होते. यांनतर सलमान खानने त्याच्यावर‌ मानहानीची केस दाखल केली होती.

याआधी देखील केआरकेने एक ट्वीट केले होते. यामध्ये त्याने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण काढत बॉलिवूडवर निशाना साधला होता. त्याने लिहिले होते की, “बॉलिवूडमधील गुंडा भाई हे आता तू 100 टक्के मनात ठेव की, जरी मी एक आऊट सायडर असेल, पण मी सुशांत सिंग नाही बनू शकत. नाही मी मरणार आणि नाही बॉलिवूड जिंकणार. यावेळी बॉलिवूड हरणार आहे. कारण यावेळी बॉलिवूडने चुकीच्या व्यक्तीसोबत पंगा घेतला आहे.”

केआरके सध्या खूपच चर्चेत आहे. तो ट्वीट करून सलमान खानवर नेहमीच निशाना साधत असतो. याच बरोबर त्याने मिका सिंगलादेखील टारगेट केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते

-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत

-घरामध्ये आई जया बच्चनला नाही, तर बायको ऐश्वर्याला घाबरतो अभिषेक बच्चन, बहीण श्वेताने केला खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.