सिड- अदितीच्या लग्नात बयोबाई आणि तात्या झाले रोमँटिक, व्हिडिओ पाहिलात का?


झी मराठी या वाहिनीवरील सगळ्याचा मालिका खूप लोकप्रिय होत आहेत. या वर्षी तब्बल ५ नव्या मालिका एका वेळेस एकाच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. प्रत्येक मालिकेची कहाणी वेगळी आणि नवीन माहिती देणारी आहे. अशातच ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं‘ ही मालिका खूप गाजत आहे. आजकाल एकत्र कुटुंबपद्धती लुप्त होत चालली आहे. प्रत्येकाला त्यांच्या जीवनातील एकांत पाहिजे आहे. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी होत चालली आहे. परंतु एकत्र कुटुंब नक्की काय असते याचे दर्शन या मालिकेने प्रेक्षकांना दिले आहे. सगळेजण एकत्र गुण्या गोविंदाने एका घरात राहू शकतात याची माहिती या मालिकेतून मिळते.

अशातच मालिकेत अत्यंत इंटरेस्टिंग ट्रॅक चालू झाला आहे. मालिकेत अदिती आणि सिद्धार्थचे लग्न होताना दिसत आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात वाढलेल्या या मुलीला सुरुवातीला माणसांची भीती वाटायची, पण आज तीच मुलगी या कुटुंबात लग्न करायला तयार झाली आहे. मालिकेत सिद्धार्थ आणि अदितीचे लग्न गावाकडच्या पद्धतीने सगळ्या रीती रिवाजानुसार दाखवण्यात आले आहे. सगळे विधी या मालिकेत दाखवले आहेत. (tujya majhya sansarla aani kay hav serial bayobai and tatya’s dance video)

मालिकेतील इतर कलाकारांचे देखील लग्न सोहळ्यात डान्स परफॉर्मन्स झाले आहेत. मालिकेतील एव्हरग्रीन जोडी बयोबाई आणि तात्या यांचा देखील एक डान्स झाला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.ते दोघे ‘मळ्याच्या मळ्या मध्ये कोण गं उभी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. गावाकडे झाडांमध्ये काढलेला त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते दोघे या मालिकेत रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

या मालिकेत हार्दिक जोशी आणि अमृता पवार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हार्दिकने या आधी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील त्याचे राणा नावाचे पात्र खूप गाजले होते. तसेच अमृताने ‘ललित २०५’ आणि ‘दुहेरी’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा :

बेगानी शादी मैं ‘मिका’ दिवाना, न बोलवताच लग्नात पोहचले मिका आणि राहुल, त्यांना बघून उडाला कल्ला

‘ही दोस्ती तुटायची नाय’, विकासने दिल्या विशालला भावी आयुष्याच्या शुभेच्छा

टेलिव्हिजन अभिनेत्री पूजा बॅनर्जींचे डोहाळे जेवण झाले संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

 


Latest Post

error: Content is protected !!