अर्चना यांनी कपिलच्या वाढलेल्या पोटावर उडवली त्याची खिल्ली; मात्र कॉमेडियनच्या उत्तराने सर्वांनाच केलं स्तब्ध


अर्चना पूरन सिंग यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात अक्षय कुमार ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर खूप मजा करताना दिसत होता. आता त्यांनी इंस्टाग्रामवर आणखी एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या या लेटेस्ट व्हिडिओमध्ये सुमोना चक्रवर्ती, भारती सिंग आणि रोशेल राव एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. मग कपिल त्यांना काहीतरी सांगतो आणि स्वत: च्या वजनाबद्दल विनोद करतो.

व्हिडिओमध्ये अर्चना भारती, सुमोना आणि रोशेलच्या जवळ जातात. त्या त्यांना विचारतात की ‘महिला मंडळी’मध्ये काय चाललंय? भारती त्यांना सांगते की त्या चुगल्या करत आहेत आणि अर्चना या त्यांच्या ‘चुगली आंटी’ आहेत. पुढे, दिवसेंदिवस तरुण होत जाण्याबद्दल भारती अर्चना यांची स्तुती करते. मग तेवढ्यात कपिल त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करतो आणि त्यांना सांगतो की अर्चना त्यांचे फॉलोव्हर्स वाढवण्यासाठी असे व्हिडिओ शूट करतात. मग अर्चना त्याला विचारते की, त्याला यामुळे जेलसी का होते? यावर कपिल म्हणतो की, तो शर्टलेस होईल मग.

तेव्हा अर्चना त्याला त्याच्या वाढलेल्या पोटाबद्दल सांगायला सांगते. यावर कपिल मजेदार अंदाजात म्हणतो, “आत्ता तर मी ६ किलो पोट आत ओढले आहे.” यासाठी त्याने आपल्या दुखापतीला जबाबदार धरले आणि सांगितले की तो लवकरच परत येईल. जेव्हा कॅमेरा परत भारतीकडे जातो, तेव्हा ती गमतीने म्हणते, “अर्चना मॅडमने मला सांगितले होते की, शूट संपताच बाटली उघड आणि मी ती उघडली.”

 

अर्चनाने काही तासांपूर्वीच हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यावर २ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज आले आहेत. चाहते व्हिडिओवर कमेंट करून अभिनेत्रीवरील प्रेम व्यक्त करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका

-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश

-‘दिल को करार आया!’ तुझ्यात जीव रंगला फेम ‘वहिनीसाहेबां’चे एक्सप्रेशन्स पाहुन चाहते झाले पुरते घायाळ


Leave A Reply

Your email address will not be published.