Sunday, June 4, 2023

ऐकाव ते नवलच! ‘या’ कलाकारांनी यशस्वी होण्यासाठी केलाय नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल

अनेकदा असं म्हटलं जातं की नावात काय असतं? पण, बॉलीवूड इंडस्ट्रीवर नजर टाकली तर नावातच यशाची रहस्य दडलेल आहे. यशाचा मार्ग कठोर परिश्रमातून जातो. पण बॉलिवूड स्टार्स कधी कधी नावाचे स्पेलिंग बदलतात. एक काळ होता जेव्हा स्टार्स फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी नावं बदलत असत, पण आता स्पेलिंग बदलण्याचा ट्रेंड आहे. अलीकडेच अभिनेत्री उर्फी जावेदने तिच्या नावाचे स्पेलिंग बदलून Uorfi असे केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. उर्फीने दुसऱ्यांदा तिच्या नावाचे स्पेलिंग बदलले आहे. पूर्वी ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या नावाचे स्पेलिंग Urrfii लिहायची. उर्फी व्यतिरिक्त बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी अंकशास्त्रज्ञांच्या सल्ल्याने नावांचे स्पेलिंग बदलले आहे. चला जाणून घेऊया…

राणी मुखर्जी  (Rani Mukherjee) –
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आणि यशराज घराण्याची सून राणी मुखर्जी हिने तिच्या कारकिर्दीच्या मध्यावर मुखर्जी या आडनावाचे स्पेलिंग बदलले. त्यांनी आपल्या नावाचे स्पेलिंग mukherji वरून mukerji असे बदलले.

अजय देवगण  (Ajay Devgn) –
अभिनेता अजय देवगणने काही वर्षांपूर्वी त्याच्या आडनावावरून ‘ए’ टाकला होता. त्याने Devgan वरुन Devgn बनवले होते. पाहिले तर त्यांच्यासाठीही ते फायदेशीर होते. त्याचे ‘गोलमाल’  आणि ‘सिंघम’ ब्लॉकबस्टर ठरले होते.

आयुष्मान खुराना (Ayushmann khurrana)  –
अभिनेता आयुष्मान खुराना याने सुदैवाच्या शोधात आपल्या नावाचे स्पेलिंग बदलले. तो त्याच्या नावात एक जास्त ‘N’ ठेवतो, तर त्याच्या आडनावामध्य एक ‘R’ जास्त लावतो.

तुषार कपूर (Tusshar kapoor)-
तुषार कपूरनेही नाव बदलले आणि त्याने त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये एक अधिक (R) जोडले. तुषार असे त्याचे नाव आहे. मात्र, नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करून त्याचा काही फायदा झाल्याचे दिसत नाही. त्याच्या कारकिर्दीची गाडी रुळावरून घसरली आहे.

हे देखील वाचा