Friday, April 19, 2024

उत्तराखंड दुर्घटनेमुळे बॉलिवूड हादरलं! संकटात सापडलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी कलाकारांनी व्यक्त केली चिंता

उत्तराखंडमध्ये  रविवारी (७ फेब्रुवारी) आलेल्या आपत्तीने अनेक लोक संकटात सापडले आहेत. त्यामुळे आता बॉलिवूडमधील कलाकारांनी या संकटात सापडलेल्या लोकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये सुपरस्टार अक्षय कुमार, अजय देवगण, खासदार आणि अभिनेता सनी देओल, तापसी पन्नू आणि सोनू सूद यांसारख्या अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.

झाले असे की, जोशीमठमध्ये नंदादेवी नाव असलेल्या हिमकड्याचा (ग्लेशियर) एक मोठा भाग तुटल्यामुळे धौली गंगा नदीमध्ये अचानक महापूर आला. या कारणामुळे तेथील हिमालयीन भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत ऋषी गंगा ऊर्जा प्रकल्पात काम करणारे ५० ते १०० कामगार मजूर बेपत्ता झाले आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारत- तिबेट सीमा पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर पूरनियंत्रक दल युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य करत आहेत.

यादरम्यान अक्षय कुमारने ट्वीट करत लिहिले की, “उत्तराखंडमध्ये हिमकडा तुटल्याचे भयानक दृश्य, सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो.”

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) चे अध्यक्ष आणि लेखक प्रसून जोशी यांनी म्हटले की, ‘त्यांना आशा आहे की, चमोली आणि उत्तराखंडचे इतर जिल्हे ग्लेशियर तुटले असले तरीही सुरक्षित राहतील. तसेच कोणाच्याही जीवाला धोका नसेल.’

चित्रपट निर्माता रॉनी स्क्रूवालाने म्हटले की, “ही दुर्घटना निसर्गाचे एक भयानक दृश्य होते.” सोबतच त्याने हवामान बदलाविषयी लोकांचा असंवेदनशील दृष्टीकोन लिहिला.

अजय देवगणने लिहिले की, तो आशा करतो की आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) टीम अधिकाधिक लोकांना वाचवण्यात यशस्वी होईल. त्याने ट्वीट करत म्हटले की, “या कठीण काळात माझ्या प्रार्थना उत्तराखंडच्या लोकांसोबत आहेत.”

पर्यावरणाच्या मुद्द्यांबाबत आवाज उठवणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर म्हणाली की, हिमालयात मानवनिर्मित बांधकामेही या शोकांतिकेत सामील आहेत. तिने ट्वीट करत म्हटले की, “उत्तराखंडमध्ये हिमकडा तुटल्याचे ऐकल्याने चिंतेत आहे. तेथील सर्व लोकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत आहे.”

सोबतच अभिनेता सोनू सूदनेही ट्वीट करत म्हटले की, “उत्तराखंड आम्ही तुमच्या सोबत आहोत.”

तापसी पन्नूने म्हटले की, “या ‘मानवी प्रेरित दुर्घटना’ डोळ्यासमोर पाहून वाईट वाटतं.”

तसेच खासदार आणि अभिनेता सनी देओलने म्हटले की, “उत्तराखंडसाठी प्रार्थना करा.”

अभिनेत्री रेणुका शहाणेने यादरम्यान लोकांना आवाहन केले आहे की, अफवांवर ध्यान देऊ नये आणि ‘निराधार व्हिडिओ’ पसरवू नका.

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने लिहिले की, “उत्तराखंडमध्ये सर्व लोकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करा आणि  आयटीबीपीच्या जवानांना त्यांच्या शौर्यासाठी सलाम.”

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानेही ट्वीट करत हेल्पलाईन नंबर शेअर केले आहेत.

हेही वाचा-

बिकिनी घालणारी भारतातील पहिली अभिनेत्री ‘शर्मिला’, ‘त्या’ फोटोंनी सर्वत्र अक्षरशः धुमाकूळ घातला होता!

होय, भारतात असं होतंच… जेव्हा गाण्यातील शब्दांमुळे रातोरात बदलावी लागली ‘ही’ गाणी; पाहा यादी

हे देखील वाचा