Tuesday, June 25, 2024

काय सांगता! अनुष्का शर्माने चक्क पती विराट कोहलीला मारला टोमणा, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि सतत चर्चेत असलेले कपल म्हणजे विराट आणि अनुष्का शर्मा. क्रिकेट आणि बॉलिवूड यांचा मेळ असलेल्या या दोघांची जोडी फॅन्ससाठी किंबहुना सर्वांसाठीच आदर्श आहे. या दोघांमध्ये असलेले प्रेम आणि बॉंडिंग नेहमीच त्यांच्या कार्यक्रमांमधील उपस्थितीमधून. सोशल मीडियावरील पोस्टवरून समजत असते. विराट आणि अनुष्का दोघेही सोशल मीडियावर सक्रिय आहे. आपल्या व्यक्त वेळापत्रकातून वेळ काढत हे दोघे अनेकदा त्यांचे सोशल मीडिया अपडेट करताना दिसतात. अनुष्का तर नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करते.

मात्र आता टीम इंडियाचा कर्णधार असलेल्या विराटने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का एका नदीच्या काठावर शांत आणि निवांत बसलेले दिसत आहे. कॅमेऱ्याकडे पाठ करून बसलेले विराट आणि अनुष्का या फोटोमध्ये खास वेळ एकमेकांसोबत घालवत आहे. हा सुंदर फोटो पोस्ट करताना विराटने कॅप्शनमध्ये लिहिले, “जर तू माझ्यासोबत आहेस, तर मला कुठेही माझ्या घरासारखेच वाटते.” यावर अनुष्काने देखील रिप्लाय दिला आहे. तिने लिहिले, “हे तर खरंच खूपच चांगले आहे, कारण तू घरी असतो तरी केव्हा.” यावर पुन्हा विराटने रिप्लाय देताना लिहिले, “हा हा हा.”

सध्या या दोघांची ही पोस्ट आणि त्यांचे रिप्लाय सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत या फोटोला ४२ लाखांपेखा अधिक लाईक्स आणि असंख्य कमेंट्स आल्या आहेत. या फोटोमध्ये अनुष्का आणि विराट नदीच्या किनारी मोठमोठ्या दगडांवर बसलेले दिसत आहे. अनुष्काने गुलाबी रंगाचा डिझायनर कोट घातला आहे, तर विराटने हिरव्या रंगाचे जॅकेट घातले आहे.

Photo Courtesy: Instagram/virat.kolhi

या दोघांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर सध्या विराट भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेत व्यस्त आहे, तर अनुष्का तिच्या मुलीला वामिकाला वेळ देत आहे. लवकरच अनुष्का चित्रपटांमध्ये पदार्पण करू शकते असे म्हटले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा