‘बंदूक तो सिर्फ़ शौक के लिए रख़ता हूं…’, जॉन अन् इमरानच्या नवीन सिनेमाचा ट्रेलर रिलीझ; सोशल मीडियावर करतोय राडा

Watch Mumbai Saga Trailer Out John Abraham As Gangster Amartya Rao And Emraan Hashmi As Encounter Specialist


बॉलिवूड चित्रपटसृष्टीत नवनवीन चित्रपटांचा सपाटाच सुरू झाला आहे. जवळपास आता सर्वच सेलिब्रिटी आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाले आहेत. त्यांचे नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता बॉलिवूडचे सुपरस्टार जॉन अब्राहम आणि इमरान हाशमी यांचाही एक चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) रिलीझ केला आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर राडा करत आहे.

जॉन आणि इमरान यांच्या नवीन चित्रपटाचे नाव ‘मुंबई सागा’ असे आहे. येत्या १९ मार्च रोजी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये आदळणार आहे. जॉन पुन्हा एकदा दमदार ऍक्शन अवतारात दिसणार आहे. आपल्या इतर चित्रपटांप्रमाणे तो या चित्रपटातही धमाके करताना दिसणार आहे. या चित्रपटातील डायलॉग्जही चाहत्यांच्या तोंडावर येऊ लागले आहेत. याव्यतिरिक्त इमरान या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत आहे, त्याला गँगस्टरच्या भूमिकेत असलेल्या जॉनचा एन्काउंटर करायचा आहे.

या चित्रपटाची कहाणी ८० आणि ९० च्या दशकातील आहे, जेव्हा मुंबईमध्ये गँगस्टर्सचा बोलबाला असायचा.  रस्त्यांवर लहान-मोठा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांकडून हप्ता वसुलीचे दृश्य दिसणे त्यावेळी साधारण बाब होती. अशामध्ये अमर्त्य राव त्यांच्याविरुद्ध उभा होतो आणि आपल्या ताकदीने गँगस्टर बनतो.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जॉन म्हणजेच अमर्त्य राव म्हणतो की, “बंदूक तो सिर्फ़ शौक के लिए रखता हूं, डराने के लिए नाम ही काफ़ी है.” जॉनने शेअर केलेल्या या ट्रेलरला ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अमर्त्य रावची हिंमत दिवसें-दिवस वाढत जाते. तो दिवसाढवळ्या एका उद्योजकाचा खून करतो. त्यामुळे अमर्त्यचे अनेक दुश्मन तयार होतात. त्याला मारण्यासाठी पोलीस अधिकारीसाठी १० करोड रुपयांचे बक्षीस जाहीर केले जाते. एन्काउंटर स्पेशलिस्ट बनलेला इमरान त्याच्या मागे हात धुवून लागतो.

या चित्रपटाचे टिझर जॉनने शेअर केले आहे. त्याने कॅप्शन देत लिहिले की, “जेव्हा बॉम्बे मुंबई नव्हती आणि रस्त्यांवर हिंसेचं राज्य़ होतं!”

‘मुंबई सागा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केले आहे. चित्रपटात जॉन आणि इमरान यांच्याव्यतिरिक्त काजल अग्रवाल, सुनील शेट्टी, रोहित रॉय, महेश मांजरेकर, गुलशन ग्रोवर, अमोल गुप्ते आणि अंजना सुखानी हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.

या चित्रपटाचे पहिले गाणे २८ फेब्रुवारीला रिलीझ केले जाईल. जॉन आणि इमरान यांची या वर्षातील हा पहिला चित्रपट आहे. दोघेही पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. मुंबई सागा १९ मार्चला बॉक्स ऑफिसवर अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांच्या ‘संदीप और पिंकी फरार’ चित्रपटाला टक्कर देईल.

जॉन यापूर्वी धूम, मद्रास कॅफे, सत्यमेव जयते, फोर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये ऍक्शन करताना दिसला आहे. तो सध्या आपल्या ‘अटॅक’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, तर दुसरीकडे इमरान हाशमीनेही त्याच्या ‘चेहरे’ चित्रपटाचं पोस्टर शेअर करत रिलीझ तारीख जाहीर केली आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.