भाजपमध्ये सामील होणारी ‘पायल सरकार’ नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या तिचा प्रवास

Who Is Payel Sarkar All You Need To Know About Actress Who Joins BJP Ahead of Asembly Election In Bengal


बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार मंडळी आज आपल्याला राजकारणात सक्रिय झालेले पाहायला मिळतात. त्यामध्ये हेमा मालिनीपासून ते उर्मिला मातोंडकरपर्यंतच्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. यामध्ये आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे, ते म्हणजे बंगाली अभिनेत्री ‘पायल सरकार’. पायल काल (२५ फेब्रुवारी) पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाली आहे. कोलकातामधील एका कार्यक्रमात तिने भाजप पक्षाची वाट धरली. या कार्यक्रमात राज्य पार्टी प्रमुख दिलीप घोष आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. तिने काही दिवसांपूर्वीच आपला ३७ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्त आपण पायलचा अभिनेत्री बनण्याचा पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

अभिनयामध्ये येण्यापूर्वी मॉडेलिंगमध्ये आजमावले नशीब
पायलचा जन्म १० फेब्रुवारी, १९८४ रोजी कोलकातामध्ये झाला होता. पायलला लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती. तिने आपले ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेल म्हणून आपली कारकीर्द घडवण्यास सुरुवात केली होती. यादरम्यानच तिचे नशीब खुलले आणि तिला बंगाली चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.  यानंतर तिने आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला. विशेष म्हणजे कॉलेजमध्ये शिकत असताना ती टेलीफिल्ममध्ये काम करण्यास करत होती.

सन २००४ साली ‘या’ सिनेमातून केली अभिनयाची सुरुवात
तिने आपल्या अभिनयाची सुरुवात सन २००४ साली बंगाली सिनेमा ‘सुधा तुमी’मधून केली होती. यानंतर ती सन २००६ साली ‘बिबर’ या सिनेमातही झळकली होती.

पायलने आतापर्यंत ३५ पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. यातील काही सिनेमांसाठी तिला पुरस्कारांनी गौरवण्यातही आले आहे. नुकतेच तिने ‘मिर्च ३’ आणि ‘हेचही’मध्ये काम केले. ती प्रसिद्ध बांग्ला मॅगझिन ‘उनिश कुरी’च्या कव्हर पेजवरही झळकली आहे. या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

बॉलिवूड सिनेमामध्येही केले काम
तिने प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बासू यांच्या ‘लव्हस्टोरी’, ‘वक्त और लेडिज स्पेशल’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. याव्यतिरिक्त तिने बॉलिवूडमध्येही आपले नशीब आजमावले आहे. तिने बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूच्या ‘गुड्डू की गन’मध्ये काम केले होते. हा सिनेमा सन २०१५ मध्ये रिलीझ झाला होता. परंतु बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप ठरला होता. सन २०१६ मध्ये ‘जोमेर राजा दिलो बोर’ यासाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सलमान जी…’, राखी सावंतच्या कँसरग्रस्त आईचा ‘भाईजान’साठी भावुक मेसेज; व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-भोजपुरी गायक नीलकमल सिंगचं होळीवरील नवीन गाणं रिलीझ; इंटरनेटवर करतंय धमाल, पाहा व्हिडिओ

-रेकॉर्ड ब्रेक युट्यूबर अंकित यादवचा नवा विक्रम, ‘त्या’ गाण्याला मिळाल्या तब्बल ६४ कोटी हिट्स


Leave A Reply

Your email address will not be published.