श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने चालवला ई-रिक्षा; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात है!’


बॉलिवूड अभिनेत्री ‘जान्हवी कपूर’ ही बॉलिवूडमधील प्रतिभावंत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आहे. आपल्या आईप्रमाणेच या चित्रपटसृष्टीत आपली जागा निर्माण करण्यासाठी जान्हवी खूपच मेहनत घेताना दिसत आहे. खरंतर जान्हवीने आतापर्यंत असा कोणताच चित्रपट केला नाहीये, की ज्यासाठी जान्हवीचे खूप कौतुक होईल. जान्हवी ही सोशल मीडियावरवर बरीच सक्रिय असताना दिसते. जान्हवी सध्या तिचा आगामी ‘गुड लक जैरी’ या चित्रपटाची शूटिंग करण्यात बिझी आहे. ती सध्या पंजाबमध्ये शूटिंग करत आहे. या चित्रपटासंदर्भातील तिचा रिक्षा चालवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जान्हवीने चालवली ई-रिक्षा
जान्हवीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ती ई- रिक्षा चालवताना दिसते. व्हिडिओमध्ये बघू शकता की, जान्हवी जो रिक्षा चालवत आहे त्यात काही प्रवाही देखील बसलेले दिसतात. या व्हिडिओमध्ये जान्हवीने सूट घातला आहे. जान्हवी ज्याप्रकारे या व्हिडिओमध्ये रिक्षा चालवत आहे, त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की ती रिक्षा चालवण्यात किती तरबेज आहे.

या व्हिडिओ सोबतच तिने आणखी काही फोटो देखील शेअर केले आहेत. यामध्ये तिची लहान बहीण खुशी आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती तिचे केस बांधताना दिसून येते.

जान्हवी कपूर ही एक अशी अभिनेत्री आहे, जिला स्टाईलबद्दल बराच अनुभव आहे. जान्हवी ही साडी, सूट ते अगदी हॉट ड्रेस घालण्यातही मागे नाही राहत. ती आपल्या चाहत्यांना आपल्या अदा दाखवण्यात कधीच मागे पडत नाही. ती तिचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. जान्हवीने आताच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही हॉट आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. अशातच तिच्या चित्रपटातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

जान्हवीचा आगामी चित्रपट
जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, मागेच तिचा ‘गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जरी ती एका चांगल्या भूमिकेत असली, तरी या चित्रपटाला काही खास यश नाही मिळाले. 2018 मध्ये आलेल्या ‘धडक’ या चित्रपटातून जान्हवीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तसेच ‘घोस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजमध्ये देखील तिने काम केले आहे.

तसेच तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास करण जोहरच्या ‘पिरियड ड्रामा तख्त’, ‘हॉरर कॉमेडी रुही अफ्जा’ आणि कार्तिक आर्यन सोबत ‘दोस्ताना 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

डायरेक्टरने प्रियांका चोप्राला दिला होता सर्जरी करून फिगर ठीक करण्याचा सल्ला; अभिनेत्रीने आपल्या पुस्तकात केला धक्कादायक खुलासा

वाढदिवस विशेष! इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून कुमार विश्वास बनले ‘कवी’, ‘चाय गरम’ चित्रपटात केला होता अभिनय

सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य

-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो

-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.