गोविंदाच्या गाण्यावर साडी नेसून महिलेने केला जबरदस्त डान्स; व्हिडिओने जिंकली प्रेक्षकांची मने


आजच्या 21 व्या शतकात सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे कोणीही मुक्तपणे व्यक्त होऊ शकतो. कोणताही फोटो किंवा व्हिडिओ काही क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. अगदी कलाकारांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सगळेजण सोशल मीडियाचा वापर करत असतात. कलाकार तर मोठ्या संख्येने सोशल मीडियावर सक्रिय असतात. अशातच सोशल मीडियावर एका व्हिडिओची जोरदार चर्चा चालू आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला गच्चीवर बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा डान्स व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. (Woman dance on govinda’s song with follow his dance steps)

बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा त्याच्या डान्स स्टाईलमुळे खूप प्रसिद्ध आहे. त्याने त्याची एक वेगळीच डान्स स्टाईल विकसित केली आहे. याची ही स्टाईल कॉपी करण्याचा अनेकजण प्रयत्न करत असतात. असाच प्रयत्न या महिलेने केला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती महिला गोविंदाच्या डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसत आहे. त्यानंतर ती गोविंदाच्या स्टाईलमध्ये गच्चीवर डान्स करत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये महिला ‘मखना’ या गाण्यावर डान्स करत आहे. तिने यामध्ये गोविंदाच्या सिग्नेचर डान्स स्टेप्स करण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ रेडिओ ऍक्टिव्ह ब्लॉसम नावाच्या एका इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

हा डान्स व्हिडिओ पाहून युजर व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तसेच युजर तिच्या डान्सचे खूप कौतुक करत आहे.

गोविंदा हा त्याच्या डान्समुळे जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच तो त्याच्या चित्रपटामुळे देखील प्रसिद्ध आहे. त्याने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याने ‘कूली नंबर 1’, ‘राजा बाबू’, ‘हीरो नंबर 1’, ‘नसीब’, ‘पार्टनर’, ‘दुल्हे राजा’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हाय गर्मी’ गाण्यावर नोरा अन् मलायकाने लावले जोरदार ठुमके; पाहून तुमचेही थिरकतील पाय

-क्या बात है! ८५ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी पाण्यात केले एरोबिक्स, तरुणाईलाही लाजवेल त्यांचा ‘हा’ उत्साह

-‘मेन विल बी मेन!’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम निखिल राऊतच्या मजेदार व्हिडिओची इंटरनेटवर धमाल


Leave A Reply

Your email address will not be published.