‘हाय गर्मी’ गाण्यावर नोरा अन् मलायकाने लावले जोरदार ठुमके; पाहून तुमचेही थिरकतील पाय


बॉलिवूडमधील अनेक प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. तिची गणना सर्वात लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये केली जाते. अनेक मोठ्या बॉलिवूड स्टा प्रमाणेच तिची फॅन फॉलोविंग आहे. खरंतर नोरा ही मूळची भारतातील नाहीये. तिचा जन्म कॅनडामधील क्युबेक सिटीमध्ये झाला आहे. पण मनाने ती भारतीय आहे. भारतात तिच्या डान्सचे कोटींमध्ये चाहते आहेत. नोरा एवढी लोकप्रिय आहे की, तिच्या जुन्या डान्सचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील नोराचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती मलायका अरोरासोबत दिसत आहे. (Nora fatehi and Malaika Arora’s dance performance on India’s best dancer stage, video get viral)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नोरा आणि मलायका जोरदार डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. या दोघींचा हा डान्स व्हिडिओ सोनी टीव्हीवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमधील आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही अभिनेत्री मंचावर डान्स करताना दिसत आहेत. या दोघींनी प्रसिद्ध ‘हाय गर्मी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा डान्स व्हिडिओ प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. मलायका देखील एक उत्कृष्ट डान्सर आहे. या दोघींना एका मंचावर डान्स करताना बघणे ही प्रेक्षकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करताना दिसत आहेत.

डान्सच्या बाबतीत नोराचा हात कोणीच धरू शकत नाही. तिच्या ‘दिलबर’ या गाण्याने तर सगळ्या गाण्यांचे रेकॉर्ड मोडून टाकले होते. नंतर ती ‘स्ट्रीट डान्सर 3’ मध्ये देखील दिसली होती. तिने ‘ओ साकी साकी’, ‘कमरिया’, ‘एक तो कम जिंदगानी’ या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे.

ती लवकरच ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हासोबत ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

मलायकाने देखील अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. तिने ‘छैया छैया’, ‘मुन्नी बदनाम हुई’ यांसारखे आयटम सॉंग केले आहेत. मलायका उत्कृष्ट डान्सर सोबत एक मॉडेल देखील आहे. तिने अनेक रियॅलिटी शो जज देखील केले आहेत. मलायका तिच्या फिटनेससाठीही सर्वत्र ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-क्या बात है! ८५ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी पाण्यात केले एरोबिक्स, तरुणाईलाही लाजवेल त्यांचा ‘हा’ उत्साह

-‘मेन विल बी मेन!’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम निखिल राऊतच्या मजेदार व्हिडिओची इंटरनेटवर धमाल

-खेसारी लाल यादवने नवीन गाण्यात केला दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स; २४ तासात मिळाले ३० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.