सिनेसृष्टीत अनेक कलाकार आहेत जे अध्यात्मिकतेवर विश्वास ठेवतात. त्यांना विचारल्याशिवाय आयुष्यात कोणतेही पाऊल उचलत नाहीत. कोणतेही काम करण्यापूर्वी ते त्यांच्या गुरूचा सल्ला घेतात. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते बॉलिवूड कलाकार जे त्यांच्या गुरूंच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करत नाहीत.
ऐश्वर्या राय बच्चन
बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) ही सत्य साईबाबांची खूप मोठी भक्त आहे.ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक मोठा निर्णय सत्यसाईंच्या सल्ल्यानंतरच घेत असे. तिने सल्यावरूनच बच्चन कुटुंबाची सून होण्याचा निर्णय घेतला होता.
View this post on Instagram
संजय दत्त
बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांना फॉलो करतो. तो अनेकदा श्री श्री रविशंकर यांची त्यांच्या आश्रमात भेट घेतो. माध्यमांनी त्याला या भेटीबाबत विचारले असता, त्याने ही खासगी बैठक सांगून प्रकरण पुढे ढकलले होते.
View this post on Instagram
हेही वाचा- आता ‘ते’ पण दाखवू काय?, विमानतळावर पोहोचलेल्या उर्फीचा ट्रोलर्सला जबरदस्त टोला
शिल्पा शेट्टी
बॉलिवूडची फिटनेस फ्रिक आणि सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा वननेस युनिव्हर्सिटीच्या आचार्य भगवान आणि अम्मा (Amma) यांच्यावर विश्वास आहे. एका पुस्तक प्रकाशन समारंभात शिल्पा म्हणाली होती की, “मी जेव्हापासून वननेस युनिव्हर्सिटीमध्ये जायला सुरुवात केली, तेव्हापासून माझ्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडला आहे.”
View this post on Instagram
शाहिद कपूर
याव्यतिरिक्त अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याचे संपूर्ण कुटुंब गुरु राधा स्वामी सत्संग व्यास (Radha Soami Satsang Beas) यांचे भक्त आहे.
View this post on Instagram
माध्यमांतील वृत्तांनुसार, राधा स्वामींच्या सत्संगात शाहिदची पत्नी मीरा राजपूत हिला शाहिदचे वडील पंकज कपूर यांनी पसंत केले होते. वास्तविक, मीराच्या कुटुंबाचाही राधास्वामी गुरूंवर विश्वास आहे. त्यांच्या लग्नाच्या वेळी सत्संगाचे प्रमुखही उपस्थित होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जान्हवी पुन्हा पोहोचली ट्रोलर्सच्या पत्त्यावर! अभिनेत्रीचा लूक पाहून नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं
‘या’ सिनेमाला मिळाले होते ऑस्कर पुरस्काराचे नामांकन, ठरलेला दुसरा मराठी सिनेमा