ख्रिसमसच्या निमित्ताने बॉयफ्रेंडला किस करताना दिसली आमिर खानची लाडकी लेक, रोमँटिक फोटो आले समोर


आमिर खानची (Aamir Khan) मुलगी इरा खान (Ira Khan) तिच्या लव्ह लाईफमुळे खूप चर्चेत असते. अलीकडेच तिने बॉयफ्रेंड नुपूर शिखारेसोबतचे ख्रिसमसचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. इरा खानने नुपूरसोबतचे तिचे नाते सार्वजनिक केले आहे. दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. तर आता आमिर खानच्या मुलीने ख्रिसमसच्या निमित्ताने बॉयफ्रेंडसोबतचा एक रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यासोबतच तिने तिच्या चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

किस करतानाचा फोटो केला शेअर
फोटोमध्ये इरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखारेच्या गालावर किस करताना दिसत आहे. तर नुपूर कॅमेऱ्याकडे बघून हसत आहे. इरा खान आणि नुपूर शिखरे यांनी सेम रंगाचे कपडे परिधान केले आहेत. दोघेही फोटोमध्ये खूप आनंदी दिसत आहेत. फोटो शेअर करत इराने लिहिले, “सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा.” (aamir khan daughter ira khan kisses boyfriend nupur shikhare on christmas)

Ira-Khan
Photo Courtesy: Instagram/khan.ira

प्रॉमिस डेच्या दिवशी केलं होतं नातं सार्वजनिक
दोन्ही लव्ह बर्ड्सने प्रॉमिस डेच्या निमित्ताने इंस्टाग्रामवर त्यांचे नाते सार्वजनिक केले होते. फोटो शेअर करत इरा खानने लिहिले होते, “तुला प्रॉमिस करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”

तसेच इराने काही काळापूर्वी थिएटर डायरेक्टर म्हणून पदार्पण केले होते. तिने एका नाटकाचे दिग्दर्शन केले होते. यामध्ये युवराज सिंगची पत्नी हेजल कीचची महत्त्वाची भूमिका होती. शिवाय आमिर खान लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्याशिवाय या चित्रपटात करीना कपूरचीही महत्त्वाची भूमिका आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!