×

अनुपम खेर यांना मिळाले अल्लू अर्जुनचे उत्तर, ‘पुष्पा’ पाहिल्यानंतर अभिनेते म्हणाले ‘तुझ्यासोबत काम…’

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट प्रत्येक व्यक्तीला वेड लावत आहे. हा चित्रपट पाहून कलाकार देखील या चित्रपटाच्या प्रेमात पडत आहे. आता या यादीत आणखी एका कलाकाराचे नाव सामील झाले आहे. ते म्हणजे अभिनेते अनुपम खेर यांचे. अनुपम यांनी थोड्या उशिरा का होईना पण हा चित्रपट पाहिला आणि चित्रपट पाहून स्वतःला त्याचे कौतुक करण्यापासून रोखू शकले नाहीत. एवढेच नाही, तर आता ते अल्लू अर्जुनसोबत काम करण्यास उत्सुक दिसत आहे. अनुपम यांनी ट्विटरवर चित्रपटावर आपले प्रेम व्यक्त केले. त्यानंतर अल्लूने जे बदल्यात केले ते तुमच्याही हृदयाला स्पर्श करेल.

अनुपम खेर (Anupam Kher) हे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहेत. आपल्या दमदार अभिनयाने सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्माण करणारे अनुपम यावेळी अल्लूचे चाहते झाले आहेत.

अनुपम यांनी अल्लू (Allu Arjun) आणि ’पुष्पा’ चित्रपटाचे कौतुक करताना लिहिले की, “पुष्पा पाहिला, हा खरोखर एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. हा पैसा वसुल चित्रपट आहे. प्रिय अल्लू अर्जुन, तू खरोखरच रॉकस्टार आहेस. तुझा प्रत्येक तपशील आणि ऍटिट्यूड आश्चर्यकारक आहे. लवकरच तुझ्यासोबत काम करण्याची संधी मिळेल अशी आशा आहे. संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन. विजयी व्हा.”

 

आता अल्लू अर्जुननेही अनुपम खेर यांच्या या ट्वीटवर आपले उत्तर दिले आहे. अनुपम यांच्या या ट्वीटला उत्तर देताना तो म्हणाला की, “अनुपम जी, तुमच्याकडून हृदयस्पर्शी प्रशंसा मिळणे खूप आनंददायी आहे. तुम्ही जे अनुभवले, हे जाणून आनंद झाला. मीही तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. एवढ्या प्रेमाबद्दल धन्यवाद.”

याशिवाय ‘पुष्पा द राइज’ चित्रपटातील गाण्यांबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री समंथा प्रभूने ‘ओ अंटा वा मावा’ गाण्यावर परफॉर्म केले. या गाण्यातील अभिनेत्रीच्या बोल्ड अभिनयाने चाहत्यांना वेड लावले होते. हे या चित्रपटाचे हिट गाणे आहे. या गाण्याच्या माध्यमातून समंथा पहिल्यांदाच आयटम नंबर करताना दिसली होती. त्यासाठी तिने मोठी रक्कमही घेतली होती.

हेही वाचा :

Latest Post