छोट्या पडद्यावरून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या पुलकित सम्राटला ‘या’ चित्रपटातून मिळाली खरी ओळख


बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट याने ‘फुकरे’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडली. त्याने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली, त्यानंतर तो मोठ्या पडद्याकडे वळला. पुलकित चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. पुलकित बुधवारी (२९ डिसेंबर) त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी त्याचे चाहते, मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्य पुलकितला वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

पुलकितचा (Pulkit Samrat) जन्म २९ डिसेंबर १९८३ रोजी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील सुनील सम्राट हे व्यापारी आहेत. पुलकित सम्राटचे संपूर्ण शिक्षण दिल्लीतच झाले आहे. ग्रॅज्युएशननंतर तो ॲडव्हर्टायझिंग कोर्स करत असताना त्याचवेळी त्याला मॉडेलिंगची ऑफर आली. अभ्यासक्रम अर्धवट सोडून पुलकित मुंबईत, स्वप्नांच्या नगरीत पोहोचला.

छोट्या पडद्यावरून ठेवले होते अभिनयाच्या दुनियेत पाऊल 

पुलकित अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीवरून केली आणि नंतर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत सामील झाले. मुंबईत पोहोचल्यानंतर तो किशोर नमित कपूर यांच्या अभिनय शाळेतून अभिनय कौशल्य शिकला. पुलकितने २००६ मध्ये एकता कपूरची प्रसिद्ध मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. पुलकितने या मालिकेत लक्ष्य वीरानीची भूमिका साकारली होती. या भूमिकेने पुलकित प्रसिद्धीच्या झोतात आला आणि त्यानंतर त्याने शो सोडला. त्यानंतर पुलकित चित्रपटांकडे वळला.

‘फुकरे’ चित्रपटातून मिळवली ओळख

‘बिट्टो बॉस’ २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून पुलकितने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २०१३ मध्ये आलेल्या ‘फुकरे’ चित्रपटातून त्याला ओळख मिळाली. यानंतर पुलकित अनेक चित्रपटांमध्ये दिसला. या चित्रपटांमध्ये डॉली की डॉली’, ‘बंगिस्तान’, ‘सनम रे’, ‘फुकरे रिटर्न्स’ ,’वीरे दी वेडिंग’ ‘पागलपंती’ आणि ‘हाथी मेरे साथी’ यांचा समावेश आहे.

पुलकितचे लग्न आणि अफेअर

पुलकितने २०१४ साली सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहरिया हिच्याशी लग्न केले. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि लवकरच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर पुलकित यामी गौतमला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पुलकित आणि श्वेताचा घटस्फोटही यामीमुळेच झाल्याचे अनेकांनी सांगितले. यामीने याच वर्षी ‘उरी’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी लग्न केले.

पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदाला जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. दोघांनी अनेक प्रसंगी आपले प्रेम व्यक्त केले आहे. पुलकितने क्रितीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर ‘आय लव्ह यू’ असे उघडपणे म्हटले होते. क्रिती आणि पुलकितने ‘वीरे दी वेडिंग’, ‘पागलपंती’ आणि ‘तैश’मध्ये एकत्र काम केले आहे. त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफसोबत ‘सुस्वागतम खुशामदीद’ या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!