‘बचत का करत नाहीत…’, म्हणत सचिन पिळगावकर यांनी दिली सविता बजाज यांच्या आर्थिक परिस्थितीवर प्रतिक्रिया


हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. नुकतेच अभिनेत्री शगुफ्ता अली यांनी त्यांची आर्थिक अडचणी सर्वांसमोर मांडल्या होत्या. याव्यतिरिक्त आणखी एका ज्येष्ठ अभिनेत्रीने खुलासा केला की, त्यादेखील आर्थिक संकटातून जात आहेत. त्या अभिनेत्री इतर कुणी नसून सविता बजाज आहेत. श्वास घेण्यात अडचण आल्याने त्यांनी साठवलेले सर्व पैसे संपले आहेत. अशातच आता सविता यांच्यासोबत ‘नदिया के पार’ चित्रपटात काम केलेले अभिनेते सचिन पिळगावर यांनी सविता यांच्या आर्थिक परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे.

इंडिया टाईम्सशी बोलताना सविता बजाज यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत बोलताना सचिन पिळगावकर यांनी म्हटले की, “वृत्तपत्रात मी सविता जी यांच्याबद्दल वाचले. माझी अशी इच्छा आहे की, असोसिएशनच्या लोकांनी मदतीसाठी पुढे यावे आणि त्यांनी कलाकार आणि कर्मचाऱ्यांची मदत करावी. जर तुम्ही IMPPA किंवा CINTAA ला मदत मागितली, तर ते नक्कीच तुमची मदत करतील. यासाठी तुम्ही त्यांचे सदस्य असणे आवश्यक नाही.” (Actor Sachin Pilgoankar Reacts To Nadiya Ke Paar Co Star Savita Bajaj Financial Condition)

सचिन यांना जेव्हा सांगितले गेले की, अभिनेत्रीची CINTAAने मदत केली आहे. त्यावेळी अभिनेते म्हणाले की, “हे पाहा दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे CINTAA कडे कोणतीही गोष्ट आलेली नाही. दुसरी म्हणजे लोक बचत का करत नाहीत. दुसऱ्यांना बोट दाखवणे सोपे आहे. मात्र, लोक विसरतात की, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना बोट दाखवता, तेव्हा ४ बोटे आपल्याकडे असतात. मी कोणत्याही कलाकारावर आरोप करत नाही. मात्र, आयुष्यात कधीही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला बचत केली पाहिजे.”

सविता बजाज यांनी आज तकशी बोलताना सांगितले होते की, “माझी आर्थिक परिस्थिती खूपच खराब आहे. माझ्या जवळ कोणीच नाही. मी खूप पैसे कमावले होते. ते सर्व उपचारासाठी खर्च झाले. बँकेत केवळ ३५ हजार रुपये होते. तेदेखील मी काढले आहेत.”

त्यांनी असेही सांगितले की, त्यांना CINTAAकडून काही मदत मिळाली आहे. ज्यामुळे त्यांचे काम सुरू आहे. मात्र, त्यांची तब्येत सध्या खराब आहे आणि वैद्यकीय खर्चासाठी ही रक्कम पुरेशी नाही. अशामध्ये सविता बजाज खूपच चिंतेत आहेत. त्यांनी सोनू सूदलाही मदतीसाठी विनंती केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

-ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ

-उर्वशी रौतेलानंतर आता मुनमुन दत्तानेही केली ‘मड बाथ’; जॉर्डनमधील फोटो होतायेत व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.