सेंसर बोर्डाने दिले प्रमाणपत्र, तरीही सलमान खानने कापले ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटामधील एकूण २१ सीन

actor salman khan offers 21 voluntary cuts to his film radhe your most wanted bhai after the film certification the film now has ua certification-slated to for eid release


सलमान खान अभिनित ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपट १३ मे रोजी, जगभरातील चित्रपटगृहांमध्ये तसेच, ‘पे-पर-व्ह्यू’ सर्व्हिस झी प्लेक्सवर ईदच्या निमित्ताने रिलीझ होणार आहे. गेल्या महिन्यातच सेंसर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (सीबीएफसी) चित्रपटात कोणताही कट न करता, थिएटर स्क्रिनिंगसाठी यूए प्रमाणपत्र दिले होते. मात्र, आता सलमान खानने स्वत: चित्रपटाच्या सीनमध्ये आणि डायलॉगमध्ये एकूण २१ कट केले आहेत.

काढून टाकण्यात आले ड्रग्स सेवनाचे ६ सीन्स
अर्थात, चित्रपटात असे काही सीन्स होते, ज्यात एका लहान मुलाला ड्रग्ज घेताना दाखवले गेले होते. असे एकूण ६ सीन्स निर्मात्यांनी चित्रपटातून काढले आहेत. सेंसर बोर्ड ड्रग्स घेणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या सीनला यूए प्रमाणपत्राच्या चित्रपटात दाखवण्याची परवानगी देत ​​नाही. तथापि, आता १२ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले देखील हा चित्रपट पाहू शकतात.

पोलीस स्टेशनच्या बाहेरचा अजानवाला सीनही हटविला
निर्मात्यांनी चित्रपटातून पोलीस स्टेशनबाहेर अजान वाचणाऱ्या लोकांचा सीनही हटविला आहे. सलमान खान स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा दर्शवित असतो. अशा परिस्थितीत, चित्रपटाच्या एका डायलॉगमध्ये स्वच्छ मुंबई बोलले गेले होते. आता ते बदलून स्वच्छ भारत करण्यात आले आहे. अशाप्रकारे, सलमानने स्वत: च्या इच्छेनुसार चित्रपटात एकूण २१ कट केले आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ होणारा सलमानचा पहिला चित्रपट
कोरोना व्हायरसच्या या परिस्थितीत, हा चित्रपट देशातील विविध भागातील मर्यादित चित्रपटगृहातच रिलीझ होणार आहे. चित्रपटगृहांशिवाय हा चित्रपट ऑनलाईनही रिलीझ करण्यात येणार आहे. आतापर्यंत सलमान खानचा कोणताही चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला नाही. अशा परिस्थितीत, ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ हा सलमान खानचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट आहे. प्रभू देवा दिग्दर्शित या चित्रपटात सलमान व्यतिरिक्त दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘चित्रपटसृष्टीची वाघीण आली’, रश्मी देसाईचा रस्त्यावरील कॅटवॉक व्हिडिओ पाहून अभिनेत्याची भन्नाट कमेंट

-‘तू एक हिरो आहेस’, अभिनेत्री सारा अली खानने केलेल्या ‘या’ कामामुळे सोनू सूदेकडून प्रशंसा

-ढोल ट्विस्टसोबत व्हायरल झाले रवीना टंडनचे ‘टिप टिप बरसा पाणी’ गाणे, अभिनेत्रीनेही व्हिडिओ केला शेअर


Leave A Reply

Your email address will not be published.