‘अरे संसार संसार’, म्हणत जेव्हा सई सेटवरच थापू लागली भाकऱ्या! नेटकऱ्यांच्या उमटतायेत प्रतिक्रिया

gautami deshpande making bhakari on set of majha hoshil na fans gave funny comments


टीव्हीवरील लोकप्रिय मालिकेंपैकी एक मालिका म्हणजेच ‘माझा होशील ना’. ही मालिका सुरू झाल्यापासूनच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यातील सई आणि आदित्यची प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. अर्थातच गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली आहे. यातील कलाकारांनी देखील अगदी कमी कालावधीत आपली खास ओळख निर्माण केली आहे.

अलिकडेच मालिकेच्या सेटवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये सई अर्थातच गौतमी मैदानावर क्रिकेट खेळताना दिसली होती. या व्हिडिओला चाहत्यांकडून खूप प्रतिसाद मिळाला होता. अशामध्ये मालिकेच्या सेटवरील आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गौतमी चक्क भाकऱ्या थापताना दिसत आहे.

होय, राजश्री मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केल्या गेलेल्या या व्हिडिओमध्ये, गौतमी भाकऱ्या थापत आहे. सोबतच तव्यावर त्यांना शेकत आहे. इतकेच नव्हे, तर ती ‘अरे संसार संसार’ हे गाणं देखील गुणगुणत आहे. मजेची बाब म्हणजे, भाकरी शेकत असताना गौतमीच्या हाताला चटका बसतो, त्याच्या वेदनेने ती उड्या मारू लागते.

या व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “जेव्हा सई सेटवर भाकऱ्या थापते.” या व्हिडिओला आतापर्यंत ७ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. तसेच गौतमीचे चाहते तिला भाकऱ्या करताना पाहून, कमेंट बॉक्समध्ये मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

गौतमीबद्दल बोलायचे झाले तर ती अभिनेत्रीसोबत गायिकाही आहे. ती प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण आहे. तिने २०१८ साली सोनी मराठी चॅनलवरील ‘सारे तुझ्याच साठी’ या मालिकेद्वारे टीव्हीवर पदर्पण केले होते. त्यानंतर गौतमी आता ‘माझा होशील ना’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेमध्ये काम करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोना काळात नागरिकांना जागरूक करण्यासाठी ‘खिलाडी’ अक्षय कुमारने केला व्हिडिओ शेअर, सांगितल्या ‘या’ ५ टिप्स

-‘मोटी हो रहीं हूँ क्या मैं?’, कॉफी घ्यायला पोहोचलेल्या राखी सावंतचा व्हिडिओ व्हायरल

-‘डान्स दीवाने’च्या मंचावर शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित, सोबतच स्पर्धकांनीही दिली साथ


Leave A Reply

Your email address will not be published.