कॅटरिनाच्या हातावर मेहेंदी काढणाऱ्या वीणा नागदा आहेत सेलिब्रिटींच्या आवडत्या मेहेंदी आर्टिस्ट, जाणून घ्या त्यांच्याबद्दल


सध्या मीडियामध्ये आणि ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये एकाच गोष्टीची चर्चा चालू आहे, आणि ती चर्चा म्हणजे कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांचे लग्न. मागील बऱ्याच दिवसांपासून येणाऱ्या यांच्या लग्नाच्या बातम्या जरी या दोघांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी मान्य केल्या नसल्या, तरी मीडियामध्ये या लग्नाची जोरदार चर्चा आहे. ७ डिसेंबर पासून कॅटरिना आणि विकी यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असून, ८ डिसेंबर रोजी कॅटरिनाच्या हातावर विकीच्या नावाची मेहेंदी लागणार असून, ती मेहेंदी बॉलिवूडमधील प्रसिद्ध मेहेंदी आर्टिस्ट वीणा नागदा काढणार आहेत.

वीणा नागदा या इंडस्ट्रीमधील सर्वांत लोकप्रिय मेहंदी आर्टिस्ट असून, लहान- मोठ्या सर्वच सेलिब्रेटींच्या हातावर वीणा स्वतः मेहेंदी काढतात. त्यांनी आतापर्यंत राणी मुखर्जी, काजोल, शिल्पा शेट्टी, करीना कपूर, ऐश्वर्या राय, आशा भोसले, डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित, जया प्रदा, एकता कपूर, सोनम कपूर, नताशा दलाल, ऋतिक रोशन, श्रीदेवी, टीना अंबानी यासोबतच इतर अनेक उद्योजक आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये मेहेंदी काढली आहे. केवळ भारतात नाही तर परदेशातही वीणा मेहेंदीसाठी प्रसिद्ध आहे. बेल्जियम, लंडन, मॉरेशियस, पेरिस, सिंगापूर आणि यूएसएमध्ये देखील त्या मेहेंदी काढण्यासाठी जातात. वीणा यांना जगात सर्वात जलद गतीने मेहंदी काढण्यासाठी पुरस्कारही मिळाले आहेत.

वीणा या ब्राइडल, अरेबिक, हीरा-मोती, स्टोन-मेहंदी, डायमंड या मेंहंदी लावण्यात निपुण असून, त्यांनी मुंबईमध्ये त्यांचे मेहेंदी इन्स्टिट्यूट देखील सुरु केले आहे. इथे मेहंदीचा प्रोफेशनल कोर्स करता येतो. आतापर्यंत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना मेहंदीच्या कलेत ट्रेंड केले आहे.

veena nagda
Photo Courtesy: Instagram/veenanagda

कॅटरिना कैफला मेहेंदी लावण्याआधी वीणा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून, त्या एका बिग फॅट वेडिंगचा भाग होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वीणा यांनी कॅटरिनाला ‘हमको दिवाना कर गये’ सिनेमाच्या वेळी मेहेंदी लावली होती. वीणा मेहंदीसाठी 15 ते 25 हजार रुपयांपर्यंत मानधन घेतात. याशिवाय मेहंदीच्या डिझाइननुसार पैसे कमी जास्त होतात.

हेही वाचा- 


Latest Post

error: Content is protected !!