मीनाक्षी शेषाद्री यांच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! पुन्हा अभिनय करण्यासाठी उत्सुक अभिनेत्री लवकरच करणार चित्रपटांमध्ये कमबॅक


हिंदी चित्रपटांमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी सिनेसृष्टीत एक काळ आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने गाजवला आहे. मात्र यशाच्या शिखरावर असताना या अभिनेत्रींनी त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी हे ग्लॅमर जग सोडले आणि सामान्य आयुष्य जगले. आपल्या सर्व जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पूर्ण केल्यानंतर, स्वतः साठी आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी अनेक नायिकांनी या क्षेत्रात पुनरागमन केले. आज त्या त्यांच्या सेकंड इनिंगमध्ये देखील यशस्वी ठरल्या आहेत.

आता याच यादीत लवकरच एक नाव जोडले जाणार आहे आणि ते म्हणजे ८० आणि ९० च्या दशकातील टॉपच्या नायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीनाक्षी शेषाद्री यांचे. वयाच्या १७ व्या वर्षी मिस इंडिया स्पर्धेत भाग घेऊन ती स्पर्धा जिंकणाऱ्या मीनाक्षी शेषाद्री यांच्या अभिनयाचे, नृत्याचे आणि सौंदर्याचे आजही असंख्य दिवाने आहेत. त्यांनी त्याच्या चित्रपटांमधून अभिनयाच्या विविध छटा अगदी हुबेहूब मांडत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

यशाच्या शिखरावर असताना त्यांनी त्यांच्या सुपरहिट ‘घातक’ सिनेमानंतर अभिनयातून ब्रेक घेण्याचे ठरवले आणि त्या त्यांच्या पतीसोबत, मुलांसोबत अमेरिकेतील टेक्सासमध्ये शिफ्ट झाल्या. जवळपास २५ वर्ष झाले मीनाक्षी चित्रपटांपासून लांब आहेत. मात्र आता मीनाक्षी लवकरच चित्रपटांमध्ये कमबॅक करणार आहे.

मीनाक्षी यांनी नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्यांच्या अभिनयाबद्दल सांगितले की, “मी अभिनयातून नक्कीच मोठा ब्रेक घेतला होता. मात्र मी या ब्रेकदरम्यान माझ्या पॅशनवर म्हणजेच माझ्या डान्सवर खूप काम केले. मी माझा डान्स माझ्यापुरताच न ठेवता तो इतरांना शिकवला. माझी मुलगी आता नोकरीच्या निमित्ताने बाहेर जाते. मुलगाही कॉलेजला जातो. त्यामुळे आता माझ्याकडे भरपूर वेळ असतो. मी माझ्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्या असून, आता माझ्याकडे एक उत्तम संधी आणि वेळ आहे पुन्हा अभिनयात येण्यासाठी. मी याबद्दल अनेकांना सांगितले देखील होते. त्यानुसार माझ्याकडे अनेक प्रस्ताव देखील आले, मात्र तेव्हाच कोरोनासारख्या महामारीने आपल्या आयुष्यात प्रवेश केला आणि सर्व थांबले. पुन्हा मला माझ्या जगात यायचे असून, यासाठी मी खूपच उत्सुक आहे.” (meenakshi seshadri want to comeback)

मीनाक्षी टेक्सासमध्ये भारतीय क्लासिकल डान्स शिकवतात. त्यांनी १९८३ साली आलेल्या ‘हिरो’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. हा सिनेमा आणि यातील गाणी तुफान गाजली. मीनाक्षी यांनी हिंदीसोबतच तमिल, तेलुगु चित्रपटांमध्ये काम केले आहे. मीनाक्षी यांच्या मुख्य सिनेमांमध्ये ‘मेरी जंग’, ‘घातक’, ‘शहेनशहा’, ‘दामिनी’, ‘इनाम दस हजार’, ‘आवारगी’, ‘स्वाती’, ‘जुर्म’, ‘घर हो तो ऐसा’, ‘देहलीज’ आदी हिट चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद

-‘ही’ गोष्ट अधिक प्रिय असल्यामुळे, बॉलिवुड पार्ट्यांमध्ये जाणे टाळतो अक्षय कुमार; अभिनेत्याने स्वत: केला होता खुलासा

-मीडियम शॉर्ट हेअरमध्ये बरीच सुंदर दिसतेय ऋता; नवीन हेअरकट फ्लाँट करताना दिसली अभिनेत्री


Leave A Reply

Your email address will not be published.