मिथिला पालकरने मोनोकिनी घालून सोशल मीडियावर लावली आग; फोटो पाहून चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका


बॉलिवूडमधील सुंदर आणि सालस अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर होय. आपल्या साध्या वेशभूषेने ती सगळ्यांचे मन जिंकून घेते. खासकरून पारंपरिक पद्धतीचा पोशाख ती परिधान करत असते. त्यामुळे सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून तिला प्रेम मिळत असतं. पण आता नुकतेच मिथिलाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. तिला या अशा लूकमध्ये पाहून सगळे चाहते खूपच हैराण झाले आहेत. (Actress mithila palkar share her bold monokini photo on social media)

मिथिला पालकरने हा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मिथिलाने मोरपंखी रंगाची एक मोनोकनी घातली आहे. तसेच त्यावर एक काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे एक श्रक घातले आहे. तिने या फोटोमध्ये अत्यंत बोल्ड पोझ दिल्या आहेत. त्यामुळे ती खूपच आकर्षक दिसत आहे. तिचा हा बोल्ड अवतार तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहते सातत्याने या फोटोला लाईक आणि कमेंट करताना दिसत आहेत. सर्वत्र तिच्या या फोटोची चर्चा चालू आहे.

मिथिलाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती मागील काही दिवसात ‘त्रिभंगा’ या चित्रपटात काजोलसोबत स्क्रीन शेअर करत होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला भरभरून दाद मिळाली होती. सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी मिथिला ही एक आहे. मिथिलाने तिच्या करीअरची सुरुवात वरुण नार्वेकर यांच्या ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटातून केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांनी काम केले आहे. यासोबतच तिने २०१४ मध्ये ‘माझा हनिमून’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.

तिने २०१८ मध्ये इरफान खान सोबत ‘कारवां’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील या दोघांच्या आंबट गोड केमिस्ट्रीने सगळ्यांना खूप हसवले, तसेच भावुक देखील केले. तसेच तिने ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हनुमाना’च्या भूमिकेने मिळवली होती तुफान लोकप्रियता; तर दारा सिंग यांच्यासोबत काम करताना घाबरायच्या अभिनेत्री

-सारा अली खानने दिली कामाख्या देवीच्या मंदिराला भेट; फोटो पाहून युजर्सने पाडला धर्मावरून प्रश्नांचा पाऊस

-वाचा हिंदी चित्रपटांमध्ये ‘प्राण’ टाकणाऱ्या अभिनेत्याची कहाणी; खलनायकी साकारून नायकालाही दिलीय त्यांनी टक्कर


Leave A Reply

Your email address will not be published.