×

‘शेवटी मला तो भेटला,’ म्हणत मौनी रॉयने केले तिच्या लग्नातील खास फोटो शेअर

टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी मौनी रॉय नुकतेच लग्नबंधनात अडकली आहे. मौनीने सुरज नांबियारयासोबत गोव्यामध्ये साथ फेरे घेतले आहेत. मौनीने तिच्या लग्नाबाबत खूप गुप्तता पाळली होती, तरी देखील तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नाच्या आधी होणारी हळद, मेहेंदी, संगीत या सगळ्या कार्यक्रमाचे फोटो देखील समोर आले आहेत. दोघांनी दाक्षिणात्य रीती-रिवाजाप्रमाणे लग्न केले आहे. त्यामुळे लग्नाच्या लूकमध्ये दोघांचाही जोडा शोभून दिसत आहे.

लग्नामध्ये मौनीने (mouni roy) पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून तिला केसरी रंगाची बॉर्डल आहे. तसेच तिने त्यावर सोन्याचे दागिने घातले असून तिचा हा ब्राइडल लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तर दुसरीकडे सुरजने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. दाक्षिणात्य जोडपे अगदी सुंदर दिसत आहे. ते दोघेही एकमेकांसोबत खूप खुश दिसत आहे. एका फोटोत सुरज मौनीला मंगळसूत्र घालताना दिसत आहे, तर आणखी एका फोटोमध्ये तो तिच्या भांगात सिंदूर भरताना दिसत आहे. (actress mouni roy got married in goa)

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

मौनीने स्वतः इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची बातमी दिली आहे. हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “शेवटी मला तो भेटला . हातात हात घालून, कुटुंब आणि मित्रांच्या आशीर्वादाने, आम्ही लग्न केले! तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे. २७.०१.२२.” तिने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक कलाकार त्यांना शुभेच्छा देत आहेत. तसचे त्यांचे चाहते देखील त्यांना वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर त्यांचे हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

हेही वाचा :

Latest Post