Sunday, April 14, 2024

अभिताभ बच्चन यांना सुपरस्टार मानत नाही नातू अगस्त्य नंदा, मोठे कारण आले समोर

बॉलीवुडचे महानायक अभिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा फक्त भारतातच नाही तर,संपुर्ण जगभरात बोलबाला आहे. त्यांची एक झलक पाहाण्यासाठी त्यांचे फॅन्स आतुर असतात. मात्र असं असलं तरी अभिताभ बच्चन यांचा नातु अगस्त्य नंदा हा त्यांना सुपरस्टार मानत नाही. माध्यमांशी बोलतांना अगस्त्य नंदाने स्वतः ही माहीती दिली आहे. आई श्वेता त्याच्यावर बारीक नजर ठेउन असते असेही सांगीतले.

आजोबांन कडून मिळते प्रेरणा
अभिताभ बच्चन यांचा नातु अगस्त्य नंदाने (Agastya Nanda) जोया अख्तर(Zoya Akhtar) यांच्या द आर्चीज(The Archies) या चित्रपटातुन बॉलिवुडमध्ये पदार्पण केले आहे. इक्कीस(Ikkis) या त्याच्या आगामी चित्रपटामुळे तो पुन्हा चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या एका सांवादात, आजोबा अभिताभ बच्चन यांच्या विषयी बोलतांना अगस्त्य म्हणाला, आजोबांच यश,सफलता त्याला जमिनीशी जोडुन राहण्याची प्रेरणा देते.

अगस्त्य नंदाने अभिताभ बच्चन यांच्या विषयी बोलतांना सांगितले, त्यांनी खुप काही कमवले आहे पण, मी त्यांना सुपरसस्टार मानत नाही. मी कायम त्यांना माझ्या आजोबांच्या रुपात पहातो. मग याचा काहीही फरक पडत नाही की त्यांच्या आजुबाजुला किती फॅन्स आहेत, किती गर्दी आहे. माझ्यासाठी ते कायम ते माझे आजोबाच राहतील.

आई श्वेताची शिकवण
अगस्त्यने सांगीतलं की त्याची आई सगळ्यात मोठी ग्राऊंडींग फॅकटर आहे. आजोबांपेक्षाही जास्त. खुप मेहनत कर आणि तुझ नाव मोठं कर,अस आई कायम सांगते.असे आई विषयी बोलतांना अगस्त्यने सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘मी जर तुमच्याबरोबर…’ श्रुती मराठेने केला मराठी इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव शेअर
कंगनानंतर करण जोहर उतरला अंकिताच्या समर्थनार्थ, विकीची घेतली चांगलीच शाळा

हे देखील वाचा