बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचे (Ajay Devgan) अनेक चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहेत, तर काही पुढील वर्षी रिलीजसाठी तयार आहेत, या सर्व चित्रपटांमध्ये ॲक्शन, कॉमेडी, थ्रिलर आणि रोमान्स बघायला मिळणार आहे. अजयचे चाहते या सर्व चित्रपटांच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पाहूयात हे सिनेमे कोणकोणते आहेत.
सिंघम अगेन
अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अनेक मोठे स्टार्स एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटात अजय व्यतिरिक्त अर्जुन कपूर, दीपिका पदिकोण, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
दे दे प्यार दे- 2
अजयच्या ‘दे दे प्यार दे’ या हिट चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी १ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंशुल शर्मा करणार आहेत. तर, तरुण जैन आणि लव रंजन यांनी लेखन केले आहे.
गोलमाल 5
अजय देवगणचा ‘गोलमाल’ हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझींपैकी एक आहे. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा लोकांच्या मनात घर करून आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस तळपदेने ‘गोलमाल 5’ संदर्भात एका मुलाखतीत सांगितले होते की, हा चित्रपट लवकरच सुरु होणार आहे.
रेड 2
दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांच्या ‘रेड 2’ या चित्रपटात वाणी कपूर अजयसोबत दिसणार आहे. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘रेड’चा हा सिक्वेल आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगण, रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांनी १० मे रोजीच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. आता अजयचे चाहते या क्राईम थ्रिलर चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
राज्यसभेत पुन्हा भडकल्या ज्या बच्चन ! यावेळी सभापतींनी दिले खणखणीत उत्तरपतीसमोर मित्राने अंकिताच्या ड्रेसशी छेडछाड केल्याने अभिनेत्री भडकली; व्हिडीओ व्हायरल