Good Bye 2021: शाहरुख अन् सलमान नव्हे, तर ‘हा’ ठरला २०२१च्या लिस्टमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता


बॉलिवूड इंडस्ट्रीत असे म्हटले जाते की, इथले काही मोजकेच नाणे चालतात, पण तसं नाही. बॉलिवुडमध्ये असे तारे आहेत ज्यांचे चाहते मजबूत आहेत. सलमान खान, शाहरुख खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत, काही असे कलाकार आहेत ज्यांच्यासाठी चाहते वेडे आहेत. जरी त्यांचे काही चित्रपट चांगले नसतील, परंतु त्यांचा कोणताही चित्रपट चाहतावर्गमुळे सुपरफ्लॉप होत नाही. म्हणून प्रत्येक दिग्दर्शक त्यांना कास्ट करण्यासाठी मागितलेली किंमत देण्यास तयार असतात. असे कलाकार खूप आहेत, आपण परंतु २०२१ सालाबद्दल बोलणार आहोत. कारण २०२१ आता संपणार आहे. तर जाणून घेऊया की, कोणत्या अभिनेत्याने यावर्षी सर्वाधिक मानधन आकारले आहे.

अक्षय कुमार ठरला सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता
मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये एका चित्रपटासाठी सर्वात जास्त मानधन घेतलेला बॉलिवुड अभिनेता इतर कोणी नाही, तर अक्षय कुमार (Akshay Kumar) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारचा मध्यंतरी एक चित्रपट रिलीझ झाला होता, ज्याचे नाव ‘बेल बॉटम ‘आहे. या चित्रपटासाठी जवळपास १३० करोड इतके मानधन घेतले होते. याच बरोबर तो बॉलिवूडचाच नाही, तर पूर्ण भारतात सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे. (akshay kumar charged highest fees in 2021 for the bell bottom know where is salman khan and shahrukh khan)

पण ‘बेल बॉटम’चे वाढते बजेट लक्षात घेऊन, वशु भगनानी यांनी अक्षय कुमारला त्याच्या मानधनामध्ये ३५ कोटी रुपयांपेक्षा जास्त मानधन कमी करण्यासाठी विनंती केली होती. पण अक्षय कुमारने या सर्व बातम्या खोट्या असल्याचे सांगितले.

अक्षय कुमारनंतर या यादीमध्ये सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) यांचे नाव येते. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानने ‘राधे’ चित्रपटाद्वारे ६० ते ७० करोडची कमाई केली आहे. परंतु शाहरुख खानचा यावर्षी कोणता चित्रपट रिलीझ झाला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’साठी १०० करोड घेणार असल्याची चर्चा होत आहे.

अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर असण्याचे कारण त्याचे सर्वच चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळतो. चाहते त्याच्या चित्रपटावर भरभरून प्रेम करतात. परंतु ‘बेल बॉटम’ हा चित्रपट काही खास नव्हता. पण नुकताच रिलीझ झालेला ‘सूर्यवंशी’ आणि पाठीमागील काही चित्रपटांने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. यात ‘हाउसफुल ४’, ‘गुड न्यूज’, ‘मिशन मंगल’, ‘केसरी’ हे चित्रपट सहभागी आहेत.

हेही वाचा-

हेही पाहा-

 


Latest Post

error: Content is protected !!