सुपरस्टार जॉन अब्राहमच्या ऍक्शन चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला; पाहून धडधडेल तुमचेही हृदय


बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असतो. यावेळी तो त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. त्याचे चाहते त्याच्या चित्रपटासाठी नेहमीच उत्सुक असतात. आता त्याच्या चाहत्यांसाठी त्याने त्याच्या ‘अटॅक’ या व्हिडिओचा टिझर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिझरबरोबरच अभिनेता जॉनने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीखही जाहीर केली आहे. हा चित्रपट २८ जानेवारी, २०२२ रोजी पडद्यावर येणार आहे. हा व्हिडिओ त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. जॉन अब्राहमने (John Abraham) टिझर शेअर करत “भारताच्या पहिल्या सुपर सोल्जरचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा,” असे लिहिले आहे.

लक्ष्य राज आनंद दिग्दर्शित आणि जॅकलिन फर्नांडिस आणि रकुलप्रीत सिंग या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपट १४ ऑगस्ट, २०२० रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, पण कोव्हिड-१९मुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबवण्यात आले होते.

या चित्रपटाततील टिझरमध्ये जॉन अब्राहम एका सैनिकच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच, जॅकलिन त्याची प्रेयसी म्हणून दाखवली आहे. यासोबतच रकुलप्रीत सिंगने (Rakulpreet Singh) एका वैज्ञानिकाची भूमिका साकारली आहे. या टिझरमध्ये मारामारीचे आणि बॉम्बस्फोटाचे सीन देखील आहेत. तसेच जॉन दुसऱ्या देशातील सैन्याशी लढताना दिसत आहे. आपल्या फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या जॉनची बॉडी आणि लूक या टिझरमध्ये कमालीची दिसत आहे.

रकुलप्रीत सिंगने तिचा इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना असे लिहिले आहे की, “देशाची सेवा करण्याचे वचन देणारा सुपर सोल्जर अखेर देशाला वाचण्यासाठी आला आहे.” यासोबतच तिने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही लिहिली आहे.

अभिनेता जॉन अब्राहमबाबत बोलायचं झालं, तर त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरील सर्व पोस्ट डिलीट केले आहेत. त्याचा वाढदिवस २७ डिसेंबर रोजी आहे. त्याने सर्व फोटो डिलीट केल्यामुळे तो सोशल मीडियावर तो चर्चेत आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!