बाहुबली फेम प्रभास ‘व्हॅलेंटाईन डे’ ला आपल्या चाहत्यांना देणार मोठ्ठं सरप्राईझ, इंस्टाग्रामवर केली मोठी घोषणा

Bahubali Superstar Prabhas Gave Valentine Day Gift To His Fans Announced On Instagram South Bhojpuri Mogi


बाहुबली फेम अभिनेता प्रभासच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या दोन्ही भागाला भरभरून यश आणि प्रसिद्धी मिळाले. यानंतर त्याचे चाहते आता त्याच्या 2 आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभास त्याच्या आगामी दोन चित्रपटाबद्दल खूपच चर्चेत आहे. ‘आदिपुरुष’ आणि ‘राधेश्याम’ हे त्याचे येणारे दोन आगामी चित्रपट आहेत. या चित्रपटांबाबत सोशल मीडियावर खूपच चर्चा रंगली आहे. त्यातच प्रभासने ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त आपल्या चाहत्यांना एक मोठ्ठं सरप्राईझ देखील देणार आहे.

नुकतेच ‘राधेश्याम’च्या निर्मात्यांनी त्यांच्या टिझरबाबत एक घोषणा केली आहे. त्यानंतर प्रभासने इंस्टाग्रामवर सगळ्या प्रेक्षकांना ‘राधेश्याम’ हा चित्रपट कधी रिलीझ होणार आहे याबाबत माहिती दिली. प्रभासने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सगळ्या प्रेक्षकांना सांगितले आहे की, त्याच्या आगामी चित्रपटाचा टिजर ‘व्हॅलेंटाईन डे’ ला म्हणजेच 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

त्याने इंस्टाग्रामवर ‘राधेश्याम’ चा एक पोस्टर देखील रिलीझ केला आहे. त्यामध्ये प्रभास एका जुन्या घरासमोर फिरताना दिसत आहे. पोस्टरवर असं लिहिलं आहे की,‌ ‘राधेश्याम 14 फेब्रुवारी सकाळी 09:18.’

प्रभासाच हा पोस्टर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये प्रभास खूपच कूल आणि डॅशिंग दिसत आहे. त्याने या पोस्ट सोबतचं असं कॅप्शन दिलं आहे की, “व्हॅलेंटाईन डे ला भेटुयात सगळे.” प्रभास हा “राधेश्याम’ या चित्रपटात एका रोमँटिक लव्हर बॉयचं पात्र निभावणार आहे. तसेच या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात प्रभास आणि पूजाची लव्हस्टोरी सगळ्या प्रेक्षकांना पाहण्यास मिळणार आहे.

‘राधेश्याम’ हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाला हिंदी सोबतच इंग्लिश आणि तेलुगु या भाषांमध्ये देखील प्रदर्शित केले जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘राधा कृष्ण कुमार’ यांनी केले आहे. तसेच ‘वामसी कृष्णा रेड्डी’, ‘प्रमोद उप्पलपती’ आणि ‘भूषण कुमार’ हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात ‘मैने प्यार किया’या चित्रपटात सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री भाग्यश्री ही देखील एक महत्त्वाचं पात्र निभावणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-नोरा फतेहीच्या ‘या’ गाण्याने लावली इंटरनेटवर आग; एकाच आठवड्यात पार केला ६ कोटी व्ह्यूजचा टप्पा, पाहा व्हिडिओ
-गावाकडच्या पोरानं आपल्या डान्सनं ‘धकधक गर्ल’ला लावले वेड; मग माधुरीनेही केली मोठी घोषणा
-बिग बींना जया बच्चन यांच्यासोबत जायचे होते लंडनला; वडील हरिवंशराय बच्चन यांना समजल्यावर म्हणाले होते, ‘आधी…’
-ए भावड्या जरा इकडं बघ! टोनी कक्करच्या ‘बूटी शेक’ गाण्यात झळकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओला मिळाले ९० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.