भोजपुरी अभिनेत्रीचे हॉलिवूडवरील प्रेम! जस्टिन बीबरनंतर आता क्रिस इवान्सवर प्रेम व्यक्त करताना दिसली राणी चटर्जी


भोजपुरी क्वीन राणी चटर्जी ही नेहमीच सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या फोटोंनी आणि व्हिडिओने प्रेक्षकांच्या मनात आग लावत असते. तिचा हॉट आणि ग्लॅमरस अंदाज पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. ती सध्या अनेक भोजपुरी चित्रपटात काम करत आहे. तसेच सोशल मीडियावर देखील तिचा चांगलाच वावर असतो. तिचे डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. तिचे डान्स मूव्ह्ज प्रेक्षकांना खूप आवडतात. आता देखील तिचा हा व्हिडिओ समोर आला आहे. (Bhojpuri actress rani chatterjee’s video viral on social media)

राणीने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती जस्टिन बीबरच्या गाण्यावर तिच्या बॉयफ्रेंडसाठी अभिनय करताना दिसत होती. तिचे हॉलिवूड प्रेम आणि स्वॅग पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत. तिने पुन्हा एकदा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती अभिनेता क्रिस इवान्सबाबत प्रेम दाखवताना दिसत आहे. तिने हा व्हिडिओ रिमिक्स केला आहे. यामध्ये एकीकडे ती तर दुसरीकडे क्रिस इवान्स दिसत आहे. या सोबतचे तिने कॅप्शन दिले आहे की, “आय लव्ह यू #chris evans” राणीने शेअर केलेल्या या व्हिडिओला २ तासातच हजारो व्ह्यूज आले आहेत.

यासोबतच राणीचा जिममधील एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये ती पूर्णपणे घामाने भिजलेली दिसत आहे.

हा फोटो शेअर करून तिने लिहिले की, “वर्क आऊटच्या आधी आणि वर्कआऊटमध्ये.” मागील अनेक दिवसांपासून ती वर्कआऊट करताना फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. तिच्या या तयारीनंतर आता तिचे चाहते असा अंदाज लावत आहेत की, ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिला प्रेक्षकांनी कलर्स टीव्हीवरील ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये देखील बघितले आहे. सगळे आता ती बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार आहे, याची वाट बघत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.